७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर सर्किट बेंच येथे राष्ट्रध्वजवंदन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

न्यायमूर्ती श्री अवचट यांनी उपास्थितांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

कोल्हापूर – ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई अधिनस्त असलेल्या सर्किट बेंच (कोल्हापूर) येथे प्रमुख न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर , न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रारंभी पोलीस विभागाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी न्यायमूर्ती श्री अवचट यांनी उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, इतर न्यायाधीश, जेष्ठ विधीज्ञ यांच्यासह सर्किट बेंचचे इतर कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.