गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचे श्रीमद् भागवत ग्रंथावर अभ्यासपूर्ण विवेचन…!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नाशिक (प्रतिनिधी): कलियुगात भक्ती वृद्धिंगत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीमद् भागवत ग्रंथाच्या पठण आणि निरूपणातून घडते. कारण सध्याच्या कठीण परिस्थितीत भक्ती तेवत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र भागवत पारायणामुळे भरकटलेल्या मनाला योग्य दिशा मिळते असे अभ्यासपूर्ण विवेचन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत, गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी केले.

गुरुपुत्र मोरे यांनी सेवामार्गाच्या केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई भागातील एरोली व बदलापूर सेवाकेंद्रात मार्गदर्शन केले. त्यांच्या दौऱ्याला सेवेकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

“पाच लाख नागरिकांच्या सहभागातून भव्य आयोजन

ठिकठिकाणच्या सेवाकेंद्रांमध्ये सेवेकऱ्यांशी हितगुज साधताना ते म्हणाले की, सत्ययुग , त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये भक्ती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. सध्या कलियुग सुरू आहे. कलियुगात वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्नांमुळे मानव इतका हवालदिल झाला आहे की, त्याच्या हातून अध्यात्मिक सेवा घडते की नाही हे ठामपणे सांगता येणे कठीण आहे. सध्याच्या काळात माणूस भरकटला आहे, मात्र श्री स्वामी सेवामार्गातून दिशाहीन लोकांना, दुःखी कष्टी लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं कार्य विनामूल्य केलं जातं. हाच धागा पकडून त्यांनी श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण आणि निरूपणाचे महत्त्व अधोरेखित केले.

२७ जूनपासून भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह

श्रीमद् भागवत हा असा एकमेव दिव्य ग्रंथ आहे की, ज्याचे केवळ पठण करून चालत नाही तर तो ग्रंथ निरुपणाच्या माध्यमातून समजून घ्यावा लागतो. त्यामुळे अध्यात्माची गोडी निर्माण होते आणि त्रस्त जीवाला मनःशांती मिळून त्याचे कल्याण होते. सेवामार्गातर्फे भगवान श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत मथुरा येथील गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी २७ जून ते ४ जुलै या काळात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह होणार आहे. यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन गुरुपुत्र श्री. मोरे यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.