समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

नाशिक (सुनिल साळवी):
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी आवाहन केले की “समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाज परिवर्तनासाठी आणि देश, धर्म, संस्कृती रक्षणासाठी श्री स्वामी महाराजांची शक्तिशाली ऊर्जा घराघरात पोहोचली पाहिजे.”

गुरुपीठात पार पडलेल्या सामूहिक पारायण उपक्रमात शनिवारी (१३ सप्टेंबर) झालेल्या गुरुचरित्र पारायणात ४७५ सेवेकर्‍यांनी तर रविवारी (१४ सप्टेंबर) झालेल्या नवनाथ भक्तिसार पारायणात तब्बल ३६०० सेवेकर्‍यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

गुरुमाऊलींचे विचार

सेवामार्ग सामाजिक सद्भावना जोपासतो आणि लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य करतो.देश, धर्म आणि संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.नैसर्गिक आपत्ती, अराजकता अशा परिस्थितीत सामूहिक प्रार्थना आणि पारायणाची ऊर्जा देशाला संरक्षण देते.अब्जचंडी, गुरुचरित्र व नवनाथ पारायण ही सर्वोच्च सामुदायिक सेवा आहे.

शिवरायांचा आदर्श अंगीकारा

गुरुमाऊलींनी स्पष्ट केले की –

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी आणि पराक्रमी इतिहास शालेय ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे.शिवरायांचा जीवनादर्श प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे.ज्यांना शिवराय खऱ्या अर्थाने कळले, त्यांनी आपली शक्ती समाजकार्यासाठी वापरली पाहिजे.

बारा लक्ष जप व गाणगापूर सत्संग

सेवामार्गाचा मासिक सत्संग २५ ऑक्टोबर २०२५ रोजी गाणगापूर दत्तधामात होणार आहे.

सेवेकऱ्यांनी “श्री स्वामी समर्थ” हा बारा लक्ष जप लिहिलेल्या वह्या सोबत आणाव्यात.

गणेशोत्सवात सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागा तर्फे एक कोटी गणपती अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम घेण्यात आला होता, ज्याला ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला.यावेळी साप्ताहिक सत्संगावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे आणि श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.