समाज एकवटला.. उत्साह वाढला.. जय नामदेव चा जयजयकार नागपुरात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी भव्य तयारीला सुरुवात — नागपूरमध्ये नियोजन बैठक उत्साही वातावरणात पार

नागपूर – संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार संपूर्ण देशभर पोहोचवून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि शिंपी समाजाचा आत्मगौरव जागवण्यासाठी येत्या जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे भव्य दिव्य अशा “संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे” आयोजन होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या नियोजनासाठी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत समाजबांधवांनी एकजुटीने निर्धार केला.

या बैठकीत अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ (नवी दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वरभाऊ धिरडे, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष खोडे, प्रमोद कोरमकर, डॉ. प्रकाश ढगे, सचिव श्याम नानोटे, तसेच विदर्भ नामदेव शिंपी समाजाचे सचिव श्री बोबडे, युवराजजी सुतोने, अँड. अमोलजी भिसे, अँड. वासुदेव घिमे, प्रा. अनिलजी भाईक, आणि छिपा शिंपी समाजाचे नीलकमल खैरवार गहलोत यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या बैठकीत बोलताना  ईश्वरभाऊ धिरडे यांनी संमेलनाची व्यापक रूपरेषा मांडताना सांगितले की, “संत नामदेव महाराजांचे जीवनकार्य आणि अध्यात्मिक विचार संपूर्ण भारतभरातील घराघरात पोहोचवण्याचा आपला संकल्प आहे. हे संमेलन केवळ समाजाचे नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील ऐक्याचे प्रतीक ठरेल.” या महासंमेलनात देशभरातून सुमारे पाच लाख समाजबांधव उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संमेलनाच्या व्यवस्थापनासाठी महिला, युवक आणि सर्व पोटशाखांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. राजकीय स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि एकत्रित कार्यक्षमतेच्या दिशेने समाजाने चालावे, असा संदेश अनेक मान्यवर वक्त्यांनी दिला.

बैठकीला नागपूर शहरातील विविध पोटशाखांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने महासंमेलनाच्या यशस्वीतेचा संकल्प केला आणि संत नामदेव महाराजांच्या कार्याची तेजस्वी ज्योत देशभर पसरवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या उपक्रमाची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे मुख संघटक श्री संतोष मुळे यांनी दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.