नागाव खणाईदेवी यात्रेनिमित्त भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांचा सदिच्छा दौरा
रुपेश आठवले:(shiroli):हातकणंगले तालुक्यातील नागाव गावात ग्रामदैवत खणाईदेवीची यात्रा १२ ते १३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडत आहे. या पारंपरिक सोहळ्यानिमित्त भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी नागावला भेट देऊन खणाईदेवीचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवीच्या ओटीला साडी-चोळी अर्पण करून, गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. “ग्रामदैवताच्या कृपेने गावातील प्रत्येक भाविकाच्या जीवनातील अडचणी दूर होवोत,” अशी मनोकामना सौ. महाडिक यांनी व्यक्त केली.
यात्रेमुळे गावात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी माजी लोकनेते सरपंच अरुण माळी, युवा नेते विजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव खाडे, पोलीस पाटील बाबासो पाटील, अशोक ऐतवडे, राहुल लंबे, निखिल जाधव, संतोष पाथरे, संभाजी जाधव, आशुतोष तोडकर, महावीर पाटील, उत्तम माळी, गणपती माळी, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष उर्फ मामा पाटील, सागर गुडाळे, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग यादव, संजय पाटील, अमर तोडकर, विद्याधर कांबळे, संतोष गेळे तसेच नागाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.