मिलिटरी ट्रेनिंग व स्काऊट अँड गाईड पाच दिवसीय प्रशिक्षण कॅम्प
गोकुळ शिरगांव – सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव या ठिकाणी सोमवार दि.२७ ऑक्टोबर २०२५ रोजी “मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प व स्काऊट अँड गाईड कॅम्प “आयोजित करण्यात आला श्री.सुभाष चौगुले साहेब सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर, श्री. शशिकांत खोत साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर, श्री.व्ही.एम.किल्लेदार साहेब सहसचिव एस.एस.सी.बोर्ड, कोल्हापूर, सौ.सारिका कासोटे मॅडम, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कागल, श्री.सागर पाटील सेवा सोसायटी चेअरमन नेर्ली, श्री.सुदर्शन खोत सरपंच सांगवडेवाडी व श्री. अर्जुन इंगळे सामाजिक कार्यकर्ते कणेरी,माननीय श्री.विलास घोळसे सर, उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ श्री.गणेश बाटे सर, थर्ड ऑफिसर असोसिएशन एन.सी.सी. तसेच श्री.सुनील पाटील साहेब, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री.साताप्पा कांबळे, श्री.सर्जेराव मिठारी, श्री. सतीश एरडोले गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत सदस्य. हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी माननीय संस्थापक श्री. के. डी. पाटील सर, प्रिन्सिपल श्री.तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ. एन. बी. केसरकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, सर्व समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी संचलन व प्रात्यक्षिक दाखविले. सौ.शोभा पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे श्री.सुभाष चौगुले साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांच्या भवितव्यासाठी मुलांनी शिस्तीचे पालन करावे असा उपदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निर्मला केसरकर मॅडम यांनी केले व सौ.एस.के.पाटील. मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली. आपली भारतीय संस्कृती हि विविधतेने नटलेली आहे.त्यामुळे मुलांमध्ये ही सर्वधर्मसमभाव व एकात्मतेची भावना निर्माण व्हावी व मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शाळेचे संस्थापक श्री.के.डी.पाटील सर यांनी हा पाच दिवसीय निवासी कॅम्प आयोजित केला आहे.

















































