– ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांना वेधणारा कर्जाचा सापळा आजच्या काळात मोबाइल आणि इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. गावातल्या तरुणांच्या हातात स्मार्टफोन असणे म्हणजे काहीसं सन्मानासारखं वाटतं. पण या सुखाचा मागोवा घेताना, किती तरुण आपल्याच आर्थिक जाळ्यात सापडतायत हे फारसे लक्षात येत नाही. म्हणतात ना, गरज आणि इच्छा यात फरक करायला हवा. पण आजच्या सोशल मिडिया युगात, गरजच काय ते कळत नाही. ‘माझ्याकडे हायफाई फोन नसेल तर मी मागेच आहे’ या भावनेतून तरुणांना भक्कम कर्जात फसवलं जातंय. कर्ज घेताना सोपी वाटणारी प्रक्रिया, पण…गावपातळीवर क्रेडिट कंपन्या, फायनान्स संस्था ‘शून्य डाऊन पेमेंट’चा मोह देतात. एक युवक म्हणतो,“१५ हजाराचा फोन मी २१ हजार हप्ता भरून घेतला. वाटलं सोप्पं आहे, पण शेवटी ६ हजार अधिक दिले… माझ्या गावातली सर्वात मोठी कमाईच उडाली.” मोबाईल काय आहे? ज्ञानाचं साधन की व्यसन?मोबाईल हे शिक्षणासाठी किंवा कामासाठी वापरावं, हे स्वप्न होतं खूप जणांच्या. पण अनेक वेळा तो व्हिडिओ, गेम्स, अनावश्यक सोशल मिडियावर वाया जातो. कर्जाचा ताण, किश्त चुकल्यावर येणाऱ्या फोन कॉलचा त्रास, घरच्यांचे आरोप हे तरुणांच्या मनावर जणू कडवट तडफड म्हणून येतात. पालकांचीही आर्थिक माघार…‘माझा मुलगा मागतोय तर देतोच’ असं पालकांचं मन पण अनेकदा भविष्यातलं कर्ज बनून परत येतं. उपायकडे एक नजर
विचार करा,आज घेतलेलं मोबाईल कर्ज तुमच्या उद्याच्या स्वप्नांवर व्याज लावत आहे. स्मार्टफोन तुमचा मित्र असो, पण आर्थिक निर्णय नेहमीच स्मार्ट घ्या. Positive Watch चे आवाहन –आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा. |