गणेश विसर्जनासाठी सजली मिरज नगरी – उत्साह, परंपरा आणि सुरक्षा यांचा संगम
750 सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन; कडेकोट पोलिस बंदोबस्त
सांगली/(भूषण मांजरेकर)
पुण्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आवर्जून घेतले जाणारे नाव म्हणजे मिरज नगरी. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेने सजलेली ही नगरी, अनंत चतुर्थीच्या दिवशी भक्ती, कला आणि शिस्त यांचा अद्वितीय संगम अनुभवते.शनिवारी शहर व उपनगरातील 750 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार असून, शहरात भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाची शिव-पार्वती हलती कमान विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रात प्रथमच हलता देखावा साकारण्यात संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत शेंगणे यांना यश आले आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक मार्गात बदल, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण, लेझर लाईट्सवर बंदी, आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई यासह सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.विशेष म्हणजे, उगारे कुटुंबीयांची तिसरी पिढी स्वागत कमानींच्या रंगकामात सहभागी झाली आहे. गेल्या ७० वर्षांपासून ही परंपरा जपणाऱ्या कुटुंबाची कला सातासमुद्रापार पोहोचली आहे. आज त्यांची मुले मुज्जमील, मोहीन आणि मुद्दसीर हेही रंगकामात जीव ओतत आहेत.
स्वागत कमानींचा आकर्षक देखावा परंपरेप्रमाणे यावर्षीही मिरवणूक मार्गावर विविध संस्थांनी भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. धर्मवीर संभाजी तरुण मंडळाची शिव-पार्वती हलती कमान विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रात प्रथमच हलता देखावा साकारण्यात संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत शेंगणे यांना यश आले आहे.
– संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेली मिरज नगरी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे. अनंत चतुर्थीनिमित्त शहर व उपनगरातील 750 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन आज होणार आहे. यासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरजचा गणेशोत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नव्हे, तर सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव आहे. येथे भक्तीला शिस्त, परंपरेला नवकल्पना आणि कलेला सामाजिक संदेशाची जोड मिळते. अशा उत्सवातूनच महाराष्ट्राची खरी ओळख घडते—जिथे श्रद्धा आणि सौंदर्य एकत्र नांदतात.
वाहतूक व सुरक्षेची तयारी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक प्रवीण गिल्डा आणि मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली.
कायदा-सुव्यवस्थेसाठी कठोर पावले विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलिस दल सज्ज. गुन्हेगारांची तात्पुरती हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाई, नोटिसा देणे अशा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लेझर लाईट्सच्या वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. |
इतर उल्लेखनीय कमानींमध्ये:
|
उगारे कुटुंबाची तिसरी पिढी रंगकामात मिरज गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. स्वागत कमानींच्या रंगकामात गेल्या 70 वर्षांपासून उगारे कुटुंबीय कार्यरत आहेत. कै. मिरासाहेब उगारे यांच्यानंतर त्यांची चार मुले – सिराज, नवाज, दस्तगीर व उस्मान – चित्रकलेत निपुण झाली. आता तिसरी पिढी – मुज्जमील, मोहीन व मुद्दसीर – रंगकामात सक्रिय असून, त्यांच्या कलाकृती सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. |
वेळेचे पालन अनिवार्य विसर्जन वेळेत पार पडावे यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येणार आहेत. वेळेचे पालन न करणाऱ्या मंडळांवर नियंत्रण ठेवले जाईल.
![]() |
![]() |