दूध संचालक तुपाशी… शेतकरी उपाशी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर ही फसवी दरवाढ… दूध संस्था चालकांची ईडीमार्फत चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा – प्रदेश अध्यक्ष भानुदास शिंदे

दौंड – गायीच्या दुधाला 34 रुपये प्रतिलिटर बाजार भावाचा शासनाचा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ दुधाला 34 रुपये बाजारभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केली आहे. दुधाचा दर कमीत कमी ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. त्यामध्ये या समितीच्या अहवालात दुधाला कमीत कमी 34 रुपये दर देण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले. असे शासन आदेश काढले आहेत.

परंतु नेहमीप्रमाणे दूध संस्था चालक यांनी दुधाचा एसएनएफ कमी दाखवून 0.1 टक्का ला 1 रुपया कमी करुन पुन्हा शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे. त्यामुळे दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी असा घणाघाती आरोप रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना संघचालक लुटत आहेत, त्यामुळे याबाबत योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. 14 कोटी लिटर दूध उत्पादन क्षमता असताना 64 कोटी लिटर दुधाची विक्री होत आहे.याचा अर्थ 70 ते 80 टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. त्यामुळे ग्राहकांना विकतचे दुखणं खरेदी करावा लागत आहे, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याचे बंधनकारक करावे, त्यामुळे खरे दूध उत्पादक शेतकरी व वास्तवातील दूध यांचा ताळमेळ बसेल व खरी माहिती पुढे येईल. त्यामुळे दूध संघचालकांची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.