विनायक जितकर
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून करणार सुरवात… आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती…
गारगोटी – शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी असणारी मातोश्री व पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेची सुरवात 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते पंचायत समिती, भुदरगड येथे तालुक्यातील ग्रामसेवक यांचेसमवेत आयोजित आढावा बैठकी बोलत होते.
![]() |
![]() |
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, प्रत्येक गावातील शेतकरी सकाळी उठल्यापासुन त्याचा दिनक्रम ज्या रस्त्यापासुन सुरु होतो ते पाणंद रस्ते मात्र दिवसेंदिवस अपुरे व अतिक्रमण होताना दिसत आहे. यामुळे शेताकडे जाणे तसेच शेतातील माल, खते, शेतीची अवजारे वाहणे जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मदत व्हावी यासाठी पाणंद रस्ते मंजूरी करीता पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश येवून रोजगाहमी मंत्री नाम.संदीपान भुमरे यांनी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यात 304 कि.मी. पाणंद रस्ते मंजूर केले. परंतू स्थानिक पातळीवर असणाऱ्या अडचणी व ग्रामसेवकांचे समन्वय नसल्यामुळे पाणंद रस्त्यांची कामे करण्यास विलंब झालेला आहे. सदर रस्ते कामांचा सुरवात 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून करावयाची ग्रामसेवकांनी गावसभा घेवून स्थानिक पदाधिकारी, नागरीक व शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करून त्यांची संमत्ती घेवून गावातील गरजेच्या पाणंद रस्त्याची निवड करावी अशा सुचना केल्या. सदरच्या पाणंदी करताना गावातील नागरीकांना विश्वासात घेवून श्रमदानातून करण्यात येणार असून 2 ऑक्टोंबर पुर्वी सर्व ग्रामसेवकांनी पाणंदीची निवड करून त्याबाबतची सर्व कागदपत्रांची पुतर्ता करावी अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी कल्याणराव निकम, गटविकास अधिकारी शेखर जाधव, अतिरिक्त गटविकास अधिकारी श्री. गरीबे, उपअभियंता बांधकाम डी. व्ही. कुंभार, उपअभियंता पाणी पुरवठा माने, भगवान पाटील, विजय सारंग, अमोल दबडे, हजारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. पंचायत समिती, भुदरगड येथे आढावा बैठकीमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित गटविकास अधिकारी शेखर जाधव, आदी मान्यवर.