मातंग समाज हा बौद्धांचा छोटा भाऊ…सत्ताधारी लोक आपल्याकडे येणार नाही

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मातंग समाज न्याय हक्क

परिषदेला कोल्हापुरात प्रतिसाद

शिरोली-(रुपेश आठवले):कोल्हापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षातर्फे  दसरा चौकामध्ये मातंग समाज हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते झाले.

यावेळी प्रा. मच्छिंद्र सकटे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मातंग समाज हा बौद्धांचा छोटा भाऊ आहे या दोन्ही समाजात नेत्यांची नाहीतर जनतेची कमी आहे. कोणी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाही. रिपब्लिकन पक्षातही अनेक गट आहेत.हे विसरून सर्वांनी भव्य ताकद उभी केली पाहिजे.

अन्यथा सत्ताधारी लोक आपल्याकडे येणार नाही. मातंग महार मांग खाटीक अशा अठरापगड जातींना जोडू या जागरूक करूया. एकत्र करू निळा पिवळा व दुश्मनाला तिथेच आवळू,असे आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

मातंग समाज न्याय परिषदेत प्रा मच्छिंद्र सकटे म्हणाले की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला नियमित वित्त पुरवठा करावा व अट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली अन्याय करणाऱ्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे.

प्रा शहाजी कांबळे म्हणाले राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौक होत असलेल्या परिषदेला विशेष महत्त्व आहे. अण्णा वायदंडे म्हणाले मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली आहे त्याचे सोनं करण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करूया.

मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे यांनी स्वागत केले विजय काळे यांनी परिषदेच्या आयोजन मागील उद्देश विशद केला सहसचिव बी के कांबळे परशुराम वाडेकर बळवंत माने अशोक बापू गायकवाड गौतम सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केली

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.