मर्दानी खेळांचा समावेश पून्हा शालेय स्पर्धेत व्हावा – श्रीमंत शाहू महाराज

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मर्दानी खेळ व भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धेत सव्यासाची गुरुकुलम, गारगोटी आखाड्याला प्रथम क्रमांक… कोल्हापुरात 23 वर्षानंतर मर्दानी खेळांच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन…

कोल्हापूर – ऐतिहासिक परंपरेचा वारसा असणाऱ्या मर्दानी खेळांचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा व्हावा असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. काही वर्षांपूर्वी हा खेळ शालेय क्रीडा प्रकारात समाविष्ट होता परंतु पुन्हा बंद झाला. मात्र आता हा मर्दानी खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी आपण शासनासोबत बोलू असे आश्वासन त्यांनी उपस्थित स्पर्धकांना दिले. यावेळी बक्षीस वितरण समारंभासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, केएसएचे सचिव मानिक मंडलिक, नंदकुमार बामणे, मर्दानी खेळांचे वस्ताद, प्रमुख पंच, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील व सुखदेव गिरी पस्थित होते.

शाही दसरा महोत्सवांतर्गत महाराष्ट्राचा रांगडा खेळ असलेल्या मर्दानी खेळ व भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धेत सव्यासाची गुरुकुलम, गारगोटी आखाड्याला प्रथम क्रमांक मिळाला. तर द्वितीय क्रमांक श्रीमंतयोगी मर्दानी खेळ आखाडा पाडळी कोल्हापूर व तृतीय क्रमांक सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर आखाड्याला मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस राजे मर्दानी आखाडा पाचगाव यांना मिळाला. शिस्तबद्ध संघ शिवगर्जना मर्दानी आखाडा कोल्हापूर तर उत्कृष्ट खेळाडू रागिनी दीप्ती पाटील, खंडोबा वेताळ मर्दानी आखाडा कोल्हापूर तसेच उत्कृष्ट खेळाडू मावळा वैभव मोहोळ शिवाजीराजे मर्दानी आखाडा पुणे यांना देण्यात आला. या स्पर्धेतील बक्षीस वितरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मनोगतामध्ये राहुल रेखावर यांनी मर्दानी खेळ हा मेहनतीचा खेळ असून प्रात्यक्षिकामधून त्याची जाणीव करून देत आहात. पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये लढाया कशा होत असतील याचेही प्रात्यक्षिक आपण दाखवलेल्या खेळांमधून होते. अशा या महत्त्वाच्या मर्दानी खेळांना आणि भारतीय युद्ध कला स्पर्धेला देश विदेशात घेऊन जाण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे आवाहन केले. यानंतर लखन जाधव व राम यादव यांनी मर्दानी खेळांचे महत्त्व आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.

ज्या शस्त्रांच्या धारेवर अनेक शाहांना लोटांगण घालायला लावले या शिवकालीन शस्त्रांचा तांडव सोहळा म्हणजे एक दुग्ध शर्करा योग. तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, संभाजी कोंढाळकर, मुरारबाजी अशा अनेक रणमर्दवीरांच्या स्मृतींना या शाही दसरा महोत्सवात उजाळा मिळाला. बक्षिस वितरण समारंभात शाहिर मिलिंद सावंत यांनी भारतीय युद्धकलेचे महत्व सांगितले.

तब्बल २३ वर्षानंतर आयोजित केलेली कोल्हापूर जिल्हा प्रशासन आयोजित राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धा शनिवारी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 50 संघानी सहभाग नोंदविला. यात सहभागी झालेले गट – शिवछत्रपती मर्दाना आखाडा निगवे, शिवशंभो मर्दानी खेळ विकास मंच, शिवसंग्राम तुरंबे, जिजा शिवकालीन शस्त्रकला गडहिंग्लज, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, छावा प्रतिष्ठान नवी मुंबई, स्वराज्य मर्दानी आखाडा निगवे, राजमुद्रा प्रतिष्ठान प्रणित सिद्धिविनायक मर्दानी आखाडा, सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिष्ठान, संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाडा, स्वराज्य मर्दानी आखाडा वळीवडे, शिवस्वरूप मर्दानी आखाडा, शिवाजी राजे मर्दानी आखाडा पुणे, राजे मर्दानी आखाडा पाचगाव, शांतीदूत मर्दानी आखाडा कोल्हापूर, शिवशंभू मर्दानी आखाडा नवलीहाळ, सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा मर्दानी आखाडा, सार्वजनिक दर्गा तालीम चोकाक, श्री शंभू महाराजांनी आखाडा पिराचीवाडी, मराठा योद्धा मर्दानी खेळ विकास मंच खुपीरे, हिंदवी स्वराज्य मर्दानी खेळ विकास कोल्हापूर, श्री गुरुकुलम कासारवाडी, श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा पाडळी खुर्द, जय भवानी मर्दानी आखाडा कोल्हापूर, शिवगर्जना मर्दानी आखाडा कोल्हापूर, हिंद प्रतिष्ठान आखाडा कोल्हापूर, सव्यासाची गुरुकुलम वेंगरूळ, आनंदराव पवार प्राचीन युद्ध कला प्रतिष्ठान, चाणक्य मर्दानी खेळ सांस्कृतिक सेवा संघ, शिवशाही मर्दानी आखाडा कोल्हापूर, सह्याद्री मर्दानी दांडपट्टा प्रतिष्ठान, वीर बाजी प्राचीन युद्ध कला दौंड, बलभीम तालीम मर्दानी खेळ, शिवाजी मराठा फौंडेशन, खंडोबा वेताळ तालीम, रणमर्द दत्ताजी शिंदे मर्दानी आखाडा आणि रामकृष्ण मर्दानी खेळ कोल्हापूर.

या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून पंडीत पोवार, नाना सावंत, लखन जाधव, प्रविण हूबाळे, प्रविण आयवळे, संतोष सुतार तर पंच म्हणून दिलीप जाधव, योगेश गुंजीकर, श्रीकांत खोत, विवेक कदम, अतुल शिंदे, अवधूत घाटगे, धनाजी सलगर, गणेश कदम, प्रविण हुले, प्रसाद देवणे, संदिप जाधव, सुरज केसरकर, धनाजी पोवार, प्रसाद कदम, योगेश पाटील, विक्रम शिंदे व उमेश कोडोलीकर यांनी काम पाहिले.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.