पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये विकी कौशल उत्कर्ष वानखेडेला म्हणाला, “मुळात हे गाणेच लाखात एक आहे, आणि तुझा आवाज देखील तितकाच अनोखा आहे.”
स्पर्धकांच्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेसने सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये या वीकएंडला ‘दिल बोले इंडिया’ या विशेष भागात सॅम बहादूर चित्रपटाच्या कलाकारांचे स्वागत करण्यात येणार आहे. विकी कौशल, सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख हे कलाकार यावेळी उपस्थित असतील. या शनिवारी स्पर्धक आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना आपले परफॉर्मन्स समर्पित करतील, आणि आपल्या गायन कौशल्याने देशभक्तीचे वातावरण उभे करतील. मराठी मुलगा- उत्कर्ष वानखेडे यावेळी ‘वंदे मातरम’ गाणे सादर करून सर्वांना भारावून टाकताना दिसेल.
उत्कर्ष वानखेडेने सांगितले की, तो हे गाणे राफेल सरकी यांना समर्पित करत आहे, जे पूर्वी भारतीय सेनेत होते. राफेलने उत्कर्षला गिटार वाजवायला शिकवली आणि ते पहिले वाद्य होते, जे उत्कर्ष वाजवायला शिकला. राफेल सरकी दार्जिलिंगचे आहेत आणि होस्ट हुसैन कुवाजेरवालाशी मनमोकळ्या गप्पा मारताना त्यांनी सांगितले की, चौथीत असल्यापासून त्यांना संगीतात रुची होती आणि कॉयर ग्रुपमध्ये ते वाद्य वाजवत असत. सेनेत गेल्यानंतर त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की, आपल्या या प्रतिभेने देखील ते देशाचा मान वाढवू शकतात. राफेल यांनी पुढे सांगितले की, सैन्यातील आयुष्य किती खडतर आहे, पण संगीत एक असे औषध आहे, जे सैनिकांना मदत करते, त्यांचे मनोबल वाढवते आणि त्यांना सदैव प्रेरित करते.
राफेलच्या भावनेशी सहमत होत परीक्षक श्रेया घोषाल म्हणाली, “आम्हाला भारतीय सशस्त्र दलांबद्दल अत्यंत आदर वाटतो. ते अहोरात्र देशाची सेवा करतात आणि त्यांच्यामुळेच आम्हाला सुरक्षित वाटते.”
विकी कौशल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “तुझा आवाज आम्हाला भिडला. तू एक प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण निर्माण केलेस. हे गाणेच मुळात लाखात एक आहे. आणि त्यात तुझा आवाज देखील अनोखा आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, एक दिवस तू हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करावेस आणि त्यावेळी तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारा चेहरा बनण्याचे भाग्य मला लाभावे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.