मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण घेणार मागे…
मुंबई – मराठा समाज सग्यासोयरऱ्यांना देखील आरक्षण मिळणार असल्याचा अध्यादेश आज वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून याची प्रत सुपूर्त करून जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेणार आहेत.
आज वाशी येथे विजयी जल्लोष होत आहे. या विजयाचे श्रेय जरांगे पाटील यांनी महाराष्टातील मराठा समाजाचा आहे असे बोलताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार आज वाशी मध्ये होत आहे. मराठा समाजाची विजयी सभा आज वाशीत होत आहे. वंशावळ जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती तयार करण्यात येणार, नोंदी सापडल्यांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ओबीसीसाठींच्या शैक्षणिक सवलती आता मराठ्यांना असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.