महायुतीकडे पुढील ५० वर्षांच्या विकासाचे व्हिजन – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – कोल्हापूर महापालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नसून, शहराच्या पुढील पाच दशकांच्या विकासाचा आराखडा ठरवणारी निर्णायक निवडणूक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शहराला आधुनिक, सुसज्ज आणि नागरिककेंद्रित बनवण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आवश्यक असून तो महायुतीकडे आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवारांसह महायुतीच्या शहरातील सर्वच उमेदवारांच्या पाठीशी कोल्हापूरकरांनी पाठीशी ठामपणे रहावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ पुईखडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर शहर आज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, तसेच शिक्षण व आरोग्य सुविधांचा ताण या सर्व बाबींवर एकत्रित आणि नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे आहे. महायुतीचे धोरण हे केवळ तात्पुरत्या उपायांपुरते मर्यादित नसून, ५० वर्षांचा विकास व्हिजन समोर ठेवून आखलेले आहे.

राधानगरी मतदारसंघातून आलेल्या नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कामाची जाण ही आपली ओळख आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना महायुतीत प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतही अशीच कामकाजाची संस्कृती रुजवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. प्रभाग क्रमांक २० मधील महायुतीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देत त्यांनी मतदारांना आवाहन केले की, स्थानिक प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची क्षमता असलेले प्रतिनिधी निवडून दिल्यासच प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य होईल. शहराचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्या आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकास योजना थेट कोल्हापूर शहरात आणल्या जात असून, त्याचा लाभ प्रत्येक प्रभागापर्यंत पोहोचवण्याचा महायुतीचा संकल्प आहे.

महायुतीची महापालिका सत्तेत आल्यास विकास, शिस्त आणि पारदर्शक प्रशासन हे त्रिसूत्री धोरण राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूरकरांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. कोल्हापूरला महाराष्ट्रातील अग्रगण्य शहरांच्या पंक्तीत नेण्यासाठी, तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी सक्षम आणि समृद्ध शहर घडवण्यासाठी महायुतीला साथ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार अमल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, नंदकुमार ढेंगे, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, हर्षल सुर्वे, अभय तेंडोलकर, अमरजा पाटील, सतीश मुगडे, बाबा नांदेकर, सुनिल रसाळ, सुनिल वाडकर, सचिन परीट, विजय जाधव, सुनिल महाडेश्वर यांच्यासह उमेदवार अभिजित खतकर, नेहा अभय तेंडुलकर, वैभव कुंभार, सुरेखा सुनिल ओटवेकर, सुषमा संतोष जाधव भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्वीच्या प्रस्थापित नेत्यांनी उपनगरांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले : अमल महाडिक

“शहराचा एक अंगीकृत भाग म्हणून उपनगरांकडे पाहिले जाते परंतु पूर्वीच्या प्रस्थापित नेत्यांनी उपनागरांकडे फक्त मते मिळविण्याचे साधन अशी भावना ठेवून स्वत:चे मोठेपण मिरविले. परंतु तेथील विकास कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे उपनगरात मुलभूत सुविधांचा वानवा दिसून येतो. आम्ही महायुतीच्या माध्यमातून उपनगरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून येथील गेल्या कित्तेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार आहोत.”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.