लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आंबेडकरी संघटनांची गारगोटी येथे बैठक

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

तुमचे… आमचे हक्काचे POSITIVEWATCH सहाव्या वर्षात पदार्पण…. तुमचे असेच प्रेम राहू दे हीच सदिच्छा…

गारगोटी (रुपेश आठवले) :
लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाच्या प्रचार व समन्वयासाठी गारगोटी येथे आंबेडकरी संघटनांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते पी. एस. कांबळे यांनी भूषवले.

बैठकीत येत्या काही दिवसांत कोल्हापूर येथे बिंदू चौकात आयोजित ‘लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनांनी एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीस तालुक्यातील विविध आंबेडकरी, समाजवादी आणि धम्म चळवळीतील नेते, तरुण कार्यकर्ते तसेच जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

मोर्चाचे निमंत्रक प्रा. शहाजी कांबळे यांनी आपल्या भाषणात म्हटले,

“देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. गवई यांच्यावरील हल्ला हा व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण लोकशाही आणि संविधानावर झालेला आघात आहे. संविधान टिकवायचे असेल, सामान्य माणसाचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवायचे असतील, तर प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान केला पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की,

“लोकशाही मोडीत काढणाऱ्यांविरोधात संघर्ष उभारणे ही आजची काळाची गरज आहे. जाती, धर्म आणि पक्षीय भेद विसरून संविधान रक्षणाच्या या लढ्यात प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे.”

बैठकीत

बबनराव शिंदे (आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष,), पश्चिम महाराष्ट्र  उपाध्यक्ष- निवास सडोलीकर,विजय कदम, मिलिंद पांगरेकर, बाळासाहेब बेगवडेकर, शिवाजी म्हसवेकर,बाजीराव नाईक, अनिल धनवडे, नामदेवराव  कांबळे, पांडुरंग कांबळे (कुरुकली), प्रकाश कांबळे, बबनराव कांबळे, आर. एस. कांबळे, श्रीकांत नादवडेकर, भिमराव कांबळे (सरवडेकर),बबनराव शिंदे, संजय जिरगे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सर्वांनी मिळून “संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या” असा निर्धार व्यक्त केला आणि लोकशाहीच्या सन्मानासाठी होणाऱ्या या महामोर्चाला भव्य प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.