पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर : खरतर आजीबाई गहिवरल्या.. डाेळ्यात आनंदाश्रू हाेते.. इतकी वर्ष अंधारात, चाचपडत वागलेल्या आजीबाईंना आता लख्ख प्रकाशात कस वागायचं हे जाणून घ्यायचं हाेतं. कारण ही तसेच हाेते. वयाच्या ६२ वर्षानंतर इथं लख्ख प्रकाश दिसत हाेता. माेठमाेठ्या शहरात सर्वत्र प्रकाशमान दिवस हाेते. मात्र आजरा सारख्या तालुक्यातील गांधीनगर भागातील नेवरेकर कॉलनीत घडलेला हा प्रकार निश्चितच काैतुकास्पद हाेता. महावितरणने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत ही कामगिरी पार पाडली हाेती. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी एका आजीबाईंच्या घरात लाईट फिटिंगसह मीटर जोडून नवीन वीजजोडणी दिली. अन् दिवाळीला आजीच्या जीवनात ‘आपुलकीचा प्रकाश’ पाडला. यामुळे आजीबाई लयी खुश हाेत्या.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला कार्यालयात येऊन आजीबाईनी लाईटची मागणी केली. आजीकडे वीजेची नवीन जोडणी देण्यासाठी घरात कुठलीच सुविधा नव्हती, त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे वीज कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करुन त्या आजींच्या घरात वायरिंग व स्विच बोर्ड बसवून नवीन वीज जोडणी दिली.
आजरा शहरातील गांधीनगर भागातील नेवरेकर कॉलनीत राहणाऱ्या श्रीमती सुशीला तुकाराम यादव (वय ६२ वर्ष) या एकट्या आजीबाई, पतीच्या निधनांतर मुलगाही वारला. अंधार दाटलेल्या आयुष्यात पुर्वी रॉकेलच्या नंतर डिझेलच्या दिव्याचा मंद प्रकाश, आजीबाईं त्यांचं आयुष्य मोठ्या जिद्दीने जगताहेत. आता नवीन वीज जोडणी मिळाल्याने दैंनदिन ज्ञानेश्वरी वाचनासाठी लख्ख प्रकाश आजीच्या सोबतीला आहे. अंधारामुळे माझ्याकडे यायला न धजावणारी नातवंड आता मला येऊन बिलगतील. या भावनेने आजीबाई गहिवरल्या.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.