पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पोलीस आहे समजताच; गर्दीतील राहिले हाताच्या बोटावर मोजण्याईतपत
कोल्हापूर शहरात केव्हा काय कसे घडेल नि कार्यकर्ते आपल्या नेत्याचं नाव घेऊन काय बोलतील याचा काही नेम नाही.. असाच प्रकार कोल्हापूर शहरातील एका भल्या मोठ्या चौकात घडला. पुण्यातील एक लाल रंगाची कार, रस्ते अतिशय खडडेमय व पुढे सिंग्नल असल्याने गर्दीतून मार्ग काढत, हळूहळू पुढे जात होती. इतक्यात, पाठीमागून येणाऱ्या एका गाडीची पुढे जाण्याची घाई सुरु होती. लवकर मार्ग मिळत नव्हता. त्यामुळे, पुणेकर व कोल्हापूरातील त्या युवकांची पुढे जाण्यावरून शाब्दिक चकमक झाली. यातुनच मागून येणाऱ्या युवकांनी थेट गाडीच आडवी लावून, पुणेकरांची कार थांबविली व जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यात पुणेकरही अंगावर धावून गेले. जोरदार शाब्दिक चकमक सुरु असताना, पुणेकरांच्या गाडीतील युवक म्हणाले, ‘मी पोलीस आहे,’ असे ऐकताच, गाडी अडविणाऱ्यातील एकजण म्हणाला…‘असे पोलीस आमच्या साहेबाच्या खिशात! मग काय;? त्या पोलिसांनी देखिल येथील काही मित्रांना काँल केला.त्यांनीही हे शब्द ऐकले. आणि खरचं वर्दीतील त्यांचे पोलीस मित्र धावून आले. दरम्यान, जवळच असलेले एक वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत, ती लाल कार बाजूला घेतली. चौकशी केली. तेही खरोखरीच स्पोर्टस व सिव्हील ड्रेसमधील पोलीस निघाले, मग मात्र, हे खरचं पोलीस आहे, कळताच, जमलेली पाच पंचवीसची गर्दी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच राहिली. नंतर, ज्यांनी गाडी आडवी लावली, त्यांनाही चला पोलीस ठाण्यात काय ते बघू.. गुन्हा नोंदवू अशी बोलाचाली सुरु झाली. त्यातच तेलंगनाचे मंत्री दौऱ्यावर अससल्याने चौकात पोलिसांची जादा संख्याही होतीच. असा प्रकार घडलाय समजताच तेही, थोडे संतापले. मग मात्र एका पी.ए.चा काँल जोडून देण्यात आला. त्यांनी समजूत काढली.. आणि अखेर या प्रकरणावर पडदा पाडला.. यावेळी, एक वाहतूक पोलीस हवालदार सांगत होते. अरे मित्रांनो कशाला कोल्हापुरकरांचे नाव खराब करता, परजिल्ह्यातून आलेल्यांना समजावून घ्या. थेट दादागिरी करणं बर नव्हं.. नवीन माणसं.. त्यात आपले रस्ते किती खराब. गाडी पुढे पळवायची तरी कशी.. असं वागण आपल्याला शोभत नाही. त्यातच नेत्याचं नाव सांगून त्यांच्याही नावाला कशाला गालबोट लावता. नेता कधीही कसही वागा सांगतो काय? निघा आता !!
(ता. क. दुसऱ्याला आदर द्या..वस्तूस्थिती समजून घ्या.. परिस्थिती जाणा मगच प्रतिक्रीया द्या.. काेल्हापूरला येणाऱ्या प्रवाशी, पर्यटकांना काेल्हापूर हे आपले आपलेसे वाटायला हवे.- (एक पाँझिटीव्ह विचार)
(बातमी नव्हे मात्र… पडद्यामागील हलक्या फुलक्या घटना व त्याचे गमतीदार परिणाम वाचत रहा आता
‘पाँझिटीव्ह वाँच स्पेशल’च्या नजरेतून )
प्रवेश घ्यायचा तर दिशा मध्येच..
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.