कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी…

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांचे खासदार म्हणून खासदार संजयदादा मंडलिक यांची ओळख आहे. त्यांनी खासदरकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय खासदार मंडलिक साहेबांना माननारा मोठा वर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ही स्वाभीमानी जनता विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रकगतीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे.

स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांनी खासदरकीच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेवून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांचेकडे सर्वसमावेशक नेवृत्व कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार संजयदादा मंडलिक यांचेकडे सुध्दा सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी मंडलिक प्रेमी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.