पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
* एकावर्षात दोघांना मिळणार होती संधी
दानोळी अकिवाट (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावसभ खेळीमेळीत पारपडली.यावेळी गाव सभेत तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध कुमार तवंदकर याची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी सरपंच श्रीमती वंदना सुहास पाटील होत्या.यावेळी ग्राम विकास अधिकारी विजय कोळी यांनी शासकीय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. तंटामुक्त अध्यक्ष पदाचा चार महीन्याचा कालावधी संपल्या नंतर गणपती कागे यांनी पदाचा राजीनामा दिला. यावेळी बिनविरोध तंटामुक्त अध्यक्षपदी कुमार तवंदकर यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्ते या़ंनी फटाके उडवून आनंद उत्सव साजरा केला.यावेळी सरपंच वंदना सुहास पाटील उपसरपंच श्रीराम हुजरे,ग्रामपंचायत अधिकारी विजय कोळी, अमोल माने, मा.तंटामुक्त अध्यक्ष गणपती कागे,जाफर तहसीलदार, सलमान बैरागदार, पोलीस पाटील सचिन कांबळे, आण्णासो पाणदारे, वैद्य आशोक गायकवाड,तहसीलदार गुरुजी, आप्पासो बडबडे, आप्पासो दानोळे, रावसाहेब नाईक, सुरज माने, निलेश तवंदकर,आण्णासो हेरवाडे, सुरज माने, पुंडलिक गायकवाड, अमोल तवंदकर याच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.