उच्च न्यायालयाच्या काेल्हापूर सर्किट बेंचचा दिलासा; या दोन आरोपींना अटकपूर्व जामीन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भरदिवसा तलवारीने हल्लासोने लूट प्रकरणी दोन आरोपींना अटकपूर्व जामीन

कोल्हापूर : हुपरी रोडवर भरदिवसा तलवारीसारख्या शस्त्राने हल्ला करून सोन्याची चेन लुटल्याच्या गंभीर गुन्ह्यात अजीम मुल्लाणी व आरिफ तुरेवाले या दोन संशयित आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी अटी व शर्थींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने यापूर्वी नाकारलेला दिलासा उच्च न्यायालयात पलटला.या प्रकरणात फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असून जमिनीच्या वाटणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होते. दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी राजारामपुरी, कोल्हापूर येथे चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर फिर्यादी हे पट्टणकडोली मार्गे हुपरीकडे परतत असताना, वाहन अडवून तलवारीसारख्या शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा व सोन्याची चेन जबरदस्ती हिसकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

ही बातमीही वाचकांना पसंत पडली    ४ वर्षे जेलमध्ये अडकले… नि प्रभावी युक्तिवादाने शेवटी जामीनावर सुटले!

या तक्रारीवरून हुपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ११५(२), ११८(१), ३५१(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ५ व २७ अंतर्गत तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील आरोपी अजीम मुल्लाणी व आरिफ तुरेवाले यांनी जिल्हा न्यायालय, इचलकरंजी येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून हत्यार व लुटलेली सोन्याची चेन अद्याप जप्त न झाल्याचे, तसेच आरोपींचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.

 

 निर्णयाविरोधात आरोपींच्या वतीने ॲड. भारत सोनुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर येथे धाव घेतली. सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी माननीय न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्या न्यायालयात या अर्जावर सविस्तर सुनावणी झाली.सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने ठाम भूमिका घेत घटनेच्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते, त्यांचा गुन्ह्यात कोणताही थेट सहभाग नाही, तसेच कौटुंबिक वादातून खोट्या तक्रारीत त्यांना गोवण्यात आल्याचा दावा केला. तक्रारदाराच्या जबाबात तफावत असून संपूर्ण फिर्याद संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. आरोपी तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचेही नमूद करण्यात आले.

गुन्हा घडला !तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन     ही बातमी देखिल जास्त वाचली गेली..

याउलट सरकार पक्षाच्या वतीने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचा, हत्यार व मुद्देमाल जप्त करणे बाकी असल्याचा तसेच आरोपींचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचा युक्तिवाद करत जामीन अर्जास तीव्र विरोध करण्यात आला.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सादर कागदपत्रांचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी आरोपी अजीम मुल्लाणी व आरिफ तुरेवाले यांना अटी व शर्थींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. भारत सोनुले, ॲड. अश्विनी बारड, ॲड. प्रीती देवर्डेकर, ॲड. सरोज देसाई यांनी काम पाहिले, तर ॲड. सतीश कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.