लालपरी हातकणंगलेच्या रस्त्यावर!
Shiroli:(रुपेश आठवले )हातकणंगले विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते पाच नवीन लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले आगाराला मंजूर झालेल्या दहा बसांपैकी पहिल्या पाच बसांचा लोकार्पण सोहळा रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर संपन्नझाला.
या बसांमुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार, अशी ग्वाही आमदार माने यांनी दिली.कार्यक्रमास अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते, जि.प. सदस्य अरुण इंगवले होते.
लोकार्पणानंतर मान्यवरांसह नव्या लालपरीतून खास सफर
यावेळी प्रसाद खोबरे, शितल हावळे, अमर इंगवले, राजू इंगवले, अनिल कांबळे, रमजान मुजावर, आप्पासो पाटील, अण्णासो चौगुले, सुहास राजमाने, विजय निंबाळकर, रावसाहेब चौगुले, संदीप कांबळे, अमित पाटील, अंकुश कांबळे, आशिष भवन, विठ्ठल बिरंजे, विनय पाटील, नंदू कुलकर्णी यांच्यासह नागरिक व प्रवासी उपस्थित.
लालपरींच्या इंजिनातून निघालेला आवाज, आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचं समाधान — हातकणंगलेसाठी आजचा दिवस खास ठरला!