शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी कारवाई करणारच- नंदकुमार माेरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर :शाळकरी मुलांना क्षमतेपेक्षा जास्त बसवून जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांना आता ‘नो टॉलरन्स’चा संदेश देत शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम उभी केली. ८ ते १० सप्टेंबरदरम्यानच्या या मोहिमेत २१ रिक्षाचालकांचे परवाने तपासून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून तब्बल ₹२.१० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. यासंबंधीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या हाेत्या, तसेच प्रत्यक्षातही मुलांच्या सुरक्षेतेची काेणतीच काळजी घेताना चालक मालक दिसत नव्हते.  त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही सातत्याने ही कारवाई सुरुच ठेवणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक नंदकुमार माेरे यांनी दिली. 

तिप्पट सीटवाल्यांवर आता कायमची नजर.. प्रमाण वाढले.. जबाबदारीचे भान ठेवावे, अन्यथा कारवाई हाेणारच. 

मोटरसायकलवर तिप्पट बसून वाहतूक नियमांच्या थेट पायमल्ली करणाऱ्यांना देखील सोडण्यात आलेले नाही. ९ व १० सप्टेंबर रोजी झालेल्या मोहिमेत ११० दुचाकी चालकांना पकडून ₹१.१० लाख दंड वसूल करण्यात आला. याआधी पाेलीस कर्मचारी वर्गाने अनेकदा समज दिली आहे. जनजागृती करण्याचे काम केले आहे, तरीही तरूणांच्या काेणताही बदल हाेताना दिसत नाही. काँलेज, शाळा परिसरात तिब्बल सिटी फिरण्याचे प्रमाण वाढले आहेत. ते तातडीने आटाेक्यात आणण्याच्या सूचनाही पाेलीस कर्मचारी यांना दिल्या आहेत.

“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालणार नाही!”

“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणताही तडजोड केला जाणार नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे ही गंभीर बाब आहे. असे प्रकार सहन केले जाणार नाहीत आणि नियम मोडणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल.”
– नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर

  • वाहनधारकांना स्पष्ट इशारा
  • वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की –

शाळकरी मुलांच्या बॅगा रिक्षाबाहेर लोंबकळणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.परवान्यापेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसवू नयेत.अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.