पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
ॲड. सोनुले यांचा युक्तीवाद ठरला, निर्णायक
कोल्हापूर : हातकणगले पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर पोक्सो प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीस अखेर कोल्हापूर विशेष न्यायालयाकडून १६ सप्टेंबर २०२५ रोजी अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनंतर ११ जुलै २०२५ रोजी भारतीय न्याय ६४(१),३(५), संहिता, पोक्सो कायदा कलम ४,६,८,१२,१४ तसेच माहिती आणि तंत्रज्ञान ६६(ए) कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. १२ जुलै रोजी आरोपीला अटक झाली होती.
“सरकारी पक्षाचा जोरदार विरोध”९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध ठाम भूमिका घेतली. पीडित आणि तिच्या आईने न्यायालयात हजर राहून आरोपीच्या जामिनाला विरोध दर्शविला. त्यासोबतच आरोपी विरोधात व्हिडिओ पुरावे, पीडितेचे वय, तसेच भक्कम पुरावे असल्याचे दाखले देण्यात आले.सरकारी पक्षाने उच्च न्यायालयातील न्यायनिर्णयांचे दाखले देऊन जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला होता.
हे प्रकरण अल्पवयीन पीडितेशी निगडित असल्याने गंभीर आणि संवेदनशील होते. तरीही न्यायालयाने सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार केला. आरोपीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असून, न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे ॲड. भारत सोनुले यांनी सांगितले. “प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने विस्तृत भाष्य करणे उचित ठरणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
आरोपीच्या बाजूचे युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. भारत सोनुले यांनी घटनामागील परिस्थिती स्पष्ट करत आरोपीविरुद्धचे पुरावे दुय्यम स्वरूपाचे असल्याचा मुद्दा मांडला. पीडित व आरोपी यांच्यातील वैयक्तिक संबंध, दोघांतील कमी वयाची दरी, फिर्याद दाखल होण्यासाठी झालेला उशीर या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडल्याने प्रकरणातील चित्र वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. “केवळ गंभीर आरोप हा एकमेव आधार ठरून जामीन फेटाळू नये” या मुद्द्यावर त्यांनी सर्व परिस्तिथी न्यायालयास पटवून दिले.
न्यायालयाचा निर्णय विशेष न्यायालयाने आरोपीच्या बाजूने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरला आणि अखेरीस अटी व शर्थीच्या अधीन राहून जामीन मंजूर केला. या लढतीत ॲड.भारत सोनुले सोनुले यांना ॲड. सरोज कृष्णा देसाई व ॲड. प्रिती श्रीपती देवर्देकर यांचे सहकार्य लाभले, तसेच विशेष मार्गदर्शन ॲड. सतीश यशवंत कुंभार यांनी केले.
आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.