मुदतवाढ.. आता प्रवेश घ्या! –सचिन साळे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास पुन्हा संधी

कोल्हापूर: सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यात मुला-मुलींच्या 18 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज स्विकारण्याची मुदत यापूर्वी 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती तथापि अजुनही वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि मॅनेजमेंट शाखेच्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक संस्थातील प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्यास दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारेमाळ, बाबर हॉस्पीटलजवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. 0231-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.