६३ वी ठरली ऐतिहासिक, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ₹१३६ कोटींचा परतावा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीत संपन्न झाली. सभेत पोटनियम दुरुस्ती, मुंबई-पुणे येथील जागा खरेदी, नवीन प्रकल्प अशा विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्या दूध उत्पादक यांना संघाच्या विविध योजनाची माहिती होण्यासाठी वैरण विकास विभाग, दूध संकलन विभाग, महिला नेतृत्व विकास, मिल्को टेस्टर विभाग, मार्केटिंग विभाग, पशुसंवर्धन विभाग, मिल्क कुलर विभाग, सेंद्रिय खते विभाग, इत्यादी विभागानचे स्टॅाल संघाच्या वतीने लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नामदार हसन मुश्रीफसो (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील,यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व सर्व संचालक यांच्या उपस्थित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत गोकुळमार्फत ५०० रेडयांचे संगोपन करणारे केंद्र लवकरच सुरू होणार. येथे रेडयांना आय.व्ही.एफ. व सेक्स सेल विर्यमात्रा वापरून गाभण केले जाईल.जिल्ह्यातील दूध उत्पादकांना उच्च वंशावळीची जनावरे माफक दरात उपलब्ध होणार.
गोकुळच्या भविष्यातील योजना –
आईस्क्रिम व चीज उत्पादन व विक्री सुरू करणे नवी मुंबई (वाशी शाखा) आणि पुणे शाखेसाठी मदर डेअरीसाठी योग्य जागा खरेदी करणे दही प्रोजेक्ट वाशी नवी मुंबई येथे राबविणे वासरू संगोपन केंद्राद्वारे ५०० वासरे तयार करणे भविष्यातील योजना व सुधारणा ५. सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी – भविष्यातील वाहनांवरील खर्च कमी करणे व पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढविण्यासाठी. |
या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्या दूध उत्पादक यांना संघाच्या विविध योजनाची माहिती होण्यासाठी वैरण विकास विभाग, दूध संकलन विभाग, महिला नेतृत्व विकास, मिल्को टेस्टर विभाग, मार्केटिंग विभाग, पशुसंवर्धन विभाग, मिल्क कुलर विभाग, सेंद्रिय खते विभाग, इत्यादी विभागानचे स्टॅाल संघाच्या वतीने लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मान. नामदार हसन मुश्रीफसो (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटीलसो (मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के.पी.पाटील,यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व सर्व संचालक यांच्या उपस्थित करण्यात आले. | जुनी दूध तपासणी मशिन बायबॅक योजना – संस्थांमध्ये जुनी मशिन घेऊन त्यांना बायबॅक पद्धतीने नवीनउन्नत दर्जाची मशिन पुरवणे.
सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी उत्पादन – ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन बासुंदीच्या नवीन प्रकारांचे उत्पादन व विक्री. ओला चारा व वाळलेला चारा मिश्रित ‘आयडीयल टी.एम.आर.’ उत्पादन – दूध उत्पादकांना उच्च दर्जाचे, पोषक व मिश्रित चारा पुरवणे.लहान व अल्पभूधारक उत्पादकांसाठी कमी किंमतीचे नवीन २ एच.पी. न्यु मॉडेल चाफकटर तयार – लवकरच उपलब्ध होणार.. रेडया संगोपन, म्हैस खरेदी अनुदान व वैरण विकास : रेडया संगोपन केंद्र (Heifer Rearing Centre) |
यावेळी अहवालावरती संस्थानी पाठविलेल्या लेखी प्रश्नाचे उत्तरांचे वाचन कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी केले. आजपासून म्हैस वास दुधास प्रतिलिटर रु.१२ व गाय वास दुधास प्रतिलिटर रु.८ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आणि संस्थांची संख्या लक्षात घेता संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करणे पोटनियम दुरुस्ती मंजुरीसाठीचा प्रस्ताव तसेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर मेकिंग मशिन व पेढा प्रोजेक्टसाठी आरबीएल बँकेकडून घेतलेल्या कर्जास मंजुरी, दूध उत्पादकांना फर्टिमिन प्लस अनुदान/मोफत/सवलतीच्या दरात देण्यात आली आहे त्यास मंजुरी, मुंबई व पुणे येथील जागा खरेदीस सभादांनी बहुमतांनी मंजूरी दिली.
![]() |
![]() |
यावेळी नामदार हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटील(मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, माजी आमदार राजेश पाटील, के.डी.डी.सी बँक संचालक ए.वाय.पाटील, अर्जुन आबिटकर, प्रताप उर्फ भैय्या माने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध संस्था प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |