![]() |
![]() |
![]() |
141 कंपन्यांचा सहभाग; 2024-25 साठी 32.36 कोटींची उपलब्धता
कोल्हापूर- (विनायक जितकर)-जिल्ह्यातील विकासासाठी खासगी कंपन्यांची सामाजिक बांधिलकी पुढे येत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 32.36 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी उपलब्ध होणार असून, या निधीचा वापर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, कला-संस्कृती, खेळ आणि झोपडपट्टी विकास या आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये केला जाणार आहे.महाराष्ट्र एनजीओ समितीचे संस्थापक युवराज रामचंद्र येडूरे यांनी ही माहिती दिली.
शिक्षण, अपंगत्व, उपजीविका : 18.63 कोटी
आरोग्य, उपासमार, कुपोषण, स्वच्छता व सुरक्षित पाणी : 8.16 कोटी
पर्यावरण संवर्धन व प्राणी कल्याण : 2.12 कोटी
खेळांना प्रोत्साहन : 1.04 कोटी
महिला सक्षमीकरण व लिंग समानता : 1.02 कोटी
वारसा कला व संस्कृती : 0.53 कोटी
ग्रामीण विकास : 0.84 कोटी
झोपडपट्टी विकास : 0.01 कोटी
141 कंपन्यांचा सहभागया निधीत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, रेमंड लाइफस्टाइल, घाटगे पाटील इंडस्ट्रीज, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, सीरम इन्स्टिट्यूट, गोदरेज अॅग्रोव्हेट, महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल, भारत पेट्रोलियम यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. एकूण 141 कंपन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत सामाजिक प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहिती, यादीसाठी महाएनजीओच्या पदाधिकारी, सदस्य यांच्याशी संपर्क साधू शकता. |
युवराज येडूरे यांचे मत“कोल्हापूर जिल्ह्यात CSR फंडाची उपलब्धता ही केवळ आकड्यांची बाब नाही, तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची संधी आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत ठोस कामे राबवली, तर समाजाला दीर्घकालीन फायदा होईल. आमची अपेक्षा आहे की जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन CSR फंडाशी जोडल्या जातील आणि खऱ्या अर्थाने समाजहित साधतील,” असे मत महाराष्ट्र एनजीओ समितीचे संस्थापक युवराज रामचंद्र येडूरे यांनी व्यक्त केले. |

संस्थापक – महाराष्ट्र एनजीओ समिती
संपर्कासाठी : अधिक माहिती जाणून घ्या..
युवराज रामचंद्र येडूरे
संस्थापक – महाराष्ट्र एनजीओ समिती
हिंदवी स्वराज्य भवन, सेक्टर-१, मुदाळ तिठ्ठा, कोल्हापूर गारगोटी मेनरोड, महाराष्ट्र – 416208
7038702896
✉️ mnda.mahango@gmail.com
maharashtrangosamiti.in