कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर उद्या १७ सप्टेंबर रोजी ‘यात्री सेवा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्याच्या उद्देशाने विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना विमानतळावर एक वेगळा आणि खास अनुभव घेता येणार आहे.
या दिवशी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे पारंपरिक पद्धतीने टिळक लावून आणि सत्कार करून स्वागत केले जाईल. स्थानिक मान्यवरांच्या हस्ते “एक पेड मां के नाम” या मोहिमेअंतर्गत विमानतळ परिसरात वृक्षारोपणही होणार आहे. तसेच, आगमन हॉलमध्ये लोकनृत्य सादर करून प्रवाशांच्या सांस्कृतिक अनुभवात भर घातली जाईल. लहान मुलांसाठी एअरस्पेस परिसरात प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांना आठवण म्हणून फोटो काढता यावेत यासाठी खास ब्रँडेड फोटो बूथ्सही उभारले जातील.
याशिवाय, प्रवाशांकडून त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणि सेवांविषयी अभिप्राय घेतला जाईल. या माहितीच्या आधारे भविष्यात सेवांमध्ये आणखी सुधारणा करता येईल. कोल्हापूर विमानतळावरील सुविधा आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींकडून प्रवाशांच्या अनुभवावर आधारित खास ब्लॉग (vlog) देखील तयार केला जाणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे कोल्हापूर विमानतळ केवळ प्रवासाचे साधन न राहता, एक आनंददायी आणि संस्मरणीय ठिकाण बनेल अशी अपेक्षा अनिल ए. शिंदे विमानतळ संचालक, कोल्हापूर हवाई अड्डा यांनी व्यक्त केली आहे![]() |
![]() या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदाब, साखर आणि हिमोग्लोबिनची तपासणी केली जाईल. यासोबतच, डोळ्यांची तपासणी आणि रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे.भविष्यात वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास शैक्षणिक दौराही आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना विमानतळाच्या कामकाजाची आणि करिअरच्या संधींची माहिती दिली जाईल. |
![]() |
.