म. वि. प्र. युवा स्पंदन 2025-26
नाशिक – नाशिक येथे पार पडलेल्या म. वि. प्र. युवा स्पंदन 2025-26 या सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम फेरीत क.का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक समुह लोकनृत्य या कलाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत आपली कला, संस्कृती आणि सादरीकरणाची उंची अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे निफाड येथे झालेल्या प्राथमिक फेरीत महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला होता. याचबरोबर मिमिक्री या कलाप्रकारातही महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन आहेर याने अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यशाची नोंद केली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे संपुर्ण संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव तसेच प्राचार्य माननीय प्रो. डॉ. सुरेश जाधव यांनी यशस्वी विद्यार्थी समुह व कला मंडळ प्रमुख डॉ. पवनजय सुदेवाड यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत टिमवर्कमध्ये गेल्या एक महिन्यापासून घेतलेल्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाले.
पारंपरिक समुह लोकनृत्य यशस्वी सहभागी विद्यार्थी –
कोमल बोंबले, अक्षदा भालेराव, गायत्री वाघ, गौरी वाघ, अंकिता दवंगे, विघ्नेश जाधव, सुदर्शन कोपटे, देवानंद पवार, स्वाती कावळे, संचिता गांगुर्डे













































