हिंगोली (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या आवारात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्यावर मंगळवारी दोघांनी गोळया झाडल्या. या प्रकरणी पोलिसांत मध्यरात्री २.४५ वाजता पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यातील आरोपी अक्षय इंदोरिया व ओम पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी दिली.
जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्यावर दि.१ ऑगस्ट रोजी गोळीबार करण्यात आला. यामध्ये पप्पु चव्हाण यांना दोन गोळया पाठीत लागुन गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सीक टिम, डॉग युनीट यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्याठिकाणी एक मोबाईल सापडला. मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर सदर मोबाईल चेक केला असता सदरचा मोबाईल हा अक्षय इंदोरीया या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीसांनी सदर मोबाईल मधील ध्वनी मुद्रीत झालेल्या रेकॉर्डींगची तपासणी केली असता त्यातील संभाषनावरुन आरोपी अक्षय इंदोरीया, सत्यम देशमूख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एक अल्पवयीन मुलाची संभाषन रेकॉडीन मिळुन आली.
या रेकॉॅर्डींगमध्ये पप्पु चव्हाण यांनी त्यांना केलेल्या मारहानीचा बदला घेण्यासाठी कट रचुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत जखमी पप्पु चव्हाण यांना पोलीसांनी संबंधिता विषयी विचारणा केली असता त्यांनी सुध्दा वरील लोकासोबत वाद झाले होते असे तोडी सांगीतले. तसेच त्यांच्यावर फायरींग झाली तेव्हा त्यांनी अपराधीला पाहीले असता तो इसम नामे अक्षय इंदोरीया असल्याचे त्यांना दिसले आहे. अक्षय इंदोरीया याचे एका पप्पु चव्हाण समर्थक कार्यकर्तेचे मुलीसोबत प्रेम संबंधातुन पप्पु चव्हाण व मुलीकडील लोकांनी अक्षय इंदोरीया व ओम पवार यांना मागील दोन माहीन्यापुर्वी जबर मारहान केली होती. तसेच त्यांनतर सत्यम देशमुख यांने पप्पु चव्हाण समर्थक मुलीचे नातेवाईकांना सांगुन सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करनार असल्याची माहीती आरोपीला मिळाली होती. त्यामुळे वरील आरोपीतांनी मारहानीचा बदला घेण्यासाठी सदरचा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. तसे पुरावे सुद्धा मिळाले त्यावरुन हिंगोली शहर पोलिसात कलम ३०७,१२० (ब) ३४ भादवी सह कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील २ आरोपी अटक करण्यात आली असुन एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेले शस्त्र व दोन जिवंत राउंड व गुन्हयात वापरलेले वाहने जप्त करण्यात आले आहेत. अटक आरोपी पैकी ओम पवार हा पप्पु चव्हाण याचा नात्याने भाचा आहे. तसेच पप्पु चव्हाण यांच्यावर सुध्दा १९ गुन्हे दाखल असुन ते सुध्दा आरोपी आहेत याचा सुध्दा तपास चालू आहे असल्याची जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना माहिती दिली.