आंदोलकांना प्राथमिक सुविधा देणे राज्य सरकार व प्रशासनची जबाबदारी- आप

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सकल मराठा समाज

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आमरण उपोषणाला आझाद मैदानावर बसले आहेत. मराठा समाजाचा प्रचंड झंजावत आंदोलन स्थळी असून, आंदोलकांना प्राथमिक सुविधा देणे राज्य सरकारची व प्रशासन जबाबदारी असताना देखील कोणत्याही सुविधा न देता आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. आंदोलनांच्या पहिल्याच दिवसापासून परिसरातील हॉटेल दुकाने बंद करून अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली आहे.
मोठे प्रमाणात पाऊस अन् दुसऱ्या बाजूला सेवा सुविधांचा वानवा यामध्ये मराठा आंदोलकांना कोंडीत अडकून आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे. हजारो गाड्यांना पार्किंगचे योग्य मार्गदर्शन न करता वाहनधारकांनी प्रचंड यातायात करून वहाने चूकीच्या मार्गाने वळवून आंदोलक आझाद मैदान येथे न पोचतील असा प्रयत्न केला आहे. मराठा सेवकांचे प्रचंड हाल करून त्यांना मुंबई सोडून जाण्याविषयी प्रयत्न प्रशासन करत आहे.या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरत शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली त्यामध्ये कोल्हापुरातून मोठया प्रमाणात रसद पुरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून आंदोलक शेवटच्या टप्प्यापर्यंत मुंबई सोडणार नाहीत. जनतेच्या पाठिंब्यावर कोल्हापूर येथून किमान १ ट्रक जीवनावश्यक वस्तू येत्या दोन दिवसात पाठवायचे नियोजन करण्याचे ठरले.


यावेळी या मागण्या मान्य व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली. 
1. आझाद मैदानाची परवानगी मुदत देण्याचा घोळ न घालता संपूर्ण कालावधीसाठी परवानगी द्यावी
2. प्रशासनाने आझाद मैदान परिसरात अन्न पाणी व राहण्यासाठी प्राथमिक शाळा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
3. अशीही मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
या प्रसंगी वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, उमेश पवार, रुपेश पाटील, राजू सावंत, संदीप देसाई शाहीर दिलीप सावंत, राहुल इंगवले, बाबा महाडिक, शैलजा भोसले, सुनिता पाटील, सुधा शिंदे, गीता हसुरकर, बबिता जाधव निलेश चव्हाण, अनिल घाटगे, उदय लाड यासह मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित राहणाऱ्या प्रमुख संघटना :

मराठा महासंघ,
मराठा सेवा संघ,
राजमाता जिजाऊ ब्रिगेड
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड
मावळा कोल्हापूर
मराठा समाज सेवा संघटन,
संभाजी ब्रिगेड,
जिजाऊ ब्रिगेड,
महाराष्ट्र क्रांती सेना
छावा संघटन
छत्रपती शाहू प्रतिष्ठान
मराठा रियासत
शिव शाहू पोवाडा मंच कोल्हापूर
विश्वशाहीर परिषद
सह्याद्री फाउंडेशन

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.