नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १६ पासून मुलाखती… शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात पक्ष निरीक्षक घेणार आढावा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज जमा करण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी – आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क कार्यालयाकडून इच्छुकांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरातील खानविलकर पेट्रोल पंपनजीक असलेल्या शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयातून उमेदवारी अर्ज देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. दरम्यान १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान इच्छुकांच्या मुलाखती पालकमंत्री प्रकाश आबिटकर घेणार आहेत.

शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले वैयक्तिक तपशील, पक्षातील कार्याचा अनुभव, स्थानिक जनसंपर्काची माहिती तसेच समाजकार्याचा तपशील यासह अर्ज नमुन्यात सादर करावेत. यासंदर्भातील अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख रविंद्र माने, सुजित चव्हाण व विजय बलुगडे यांनी दिली आहे.

निवडणूकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरु होणार असून, १७ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. दरम्यान पक्ष कार्यालयाकडे प्राप्त अर्जांची छाननी पक्षाच्या स्थानिक निवडणूक समितीमार्फत केली जाईल. अर्जदाराच्या कामगिरी, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठेच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड निश्चित करण्यात येईल. पक्षाशी एकनिष्ठ राहून सतत जनतेत कार्य करणारे, समाजहिताच्या प्रश्नांवर लढणारे आणि शिवसेनेच्या विचारसरणीशी बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांनीच अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपातळीवरही शिवसेना संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जनतेची सेवा आणि विकासासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटन बळकटी आणि पक्षविस्तार यावर लक्ष केंद्रित करत दररोज विविध ठिकाणी पक्षप्रवेश सुरू आहेत. परिणामी नगरपरिषद,नगरपालिकेसाठी इच्छुकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमद्ये नवचैतन्य आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.