कोल्हापूरमधील स्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करा – चंद्रकांत माने

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व बसची तांत्रिक तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी – राज्यातील महामार्गांवर धावणाऱ्या खासगी स्लिपर कोच बसना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधून विविध लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या सर्व खासगी स्लिपर कोच बसची तपासणी 31 मार्च 2026 पर्यंत करून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई, पुणे, नागपूर, गुजरात, हैदराबाद तसेच इतर राज्यांकडे अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या स्लिपर कोच बस दररोज धावतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व बसची तांत्रिक तपासणी करणे आवश्यक असल्याने वाहनमालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी केले आहे. राज्यात अलीकडेच समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. यापूर्वीही सिंदखेडराजा व इतर ठिकाणी बसला आग लागून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.

त्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व स्लिपर कोच बसची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान मोटार वाहन अधिनियम 1988 तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार आणि AIS-119 व AIS-052 या सुरक्षा मानकांनुसार बसची रचना तपासली जाणार आहे. अनधिकृत संरचनात्मक बदल किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे नोंदणी असलेल्या सर्व स्लिपर कोच बस वाहनमालकांनी आपल्या वाहनांची तपासणी 31 मार्च 2026 पर्यंत RTO कार्यालयात करून घ्यावी. ही तपासणी पूर्णपणे निशुल्क आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.