आबिटकर नॉलेज सिटी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संस्थेचे प्रमुख भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन

गारगोटी प्रतिनिधी – देशाचा ७9 वा स्वातंत्र्य दिन आबिटकर नॉलेज सिटी येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्याला राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी इंजिनीअरींग व कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले की, देश घडविण्यासाठी योगदान द्यायचं असेल तर बौद्धिक क्षमतेसोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता हवी. आपला देश हा युवकांचा देश आहे. अभ्यासासोबतच व्यायाम व योगा यांच्यावर लक्ष केंद्रीत करा आणि स्वतःला सक्षम व सुदृढ बनवा असे आवाहन केले. यावेळी इंजिनीअरींग विभागाचे प्राचार्य अमर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक अजित आबिटकर, श्रीधर भोईटे, विद्याधर परीट, पाल सरपंच सुशिला गुरव, उपसरपंच दिगंबर देसाई, अरुणराव शिंदे, चंद्रकांत चव्हाण, राजाराम भराडे, योगेश पाटील, सागर मिसाळ यांच्यासह गारगोटीचे उपसरपंच, सदस्य व विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भक्ती भावना, प्रा.पुजा पाटील यांनी केले तर आभार प्राचार्या दिपाली गोसावी यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.