हाजगोळी येथे हलकर्णी महाविधालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीर…
हलकर्णी – ‘श्रम आणि संस्कार हे दोन शब्द आपल्याला घडवतात. दोन्हींची सवय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आहे. सहजीवनाचे महत्त्व या शिबिरातून अधोरेखित होईल. शिबिरार्थी सर्व गावाला एकत्र करण्याचे काम करतात. एकमेकाची तुलना करणे टाळावे विद्यार्थी असो व नागरिक प्रत्येक व्यक्तीची एक ओळख आहे. स्वतःला स्वीकारा म्हणजे, व्यक्तिमत्व विकास होईल स्वतः शी तुलना करा. प्रत्येकाने ध्येय ठरवले पाहिजेत. संगत चांगली ठेवा कारण ती फार महत्त्वाची आहे. पुस्तकांचे वाचन करा अनेक महामानवांचे विचार आत्मसात करा. हुशार माणसांच्या सानिध्यात रहा म्हणजे व्यक्तिमत्व विकास होईल.’ असे प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी हजगोळी (ता. चंदगड) येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि मा शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर अंतर्गत दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी (ताचंदगड) यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 2 जानेवारी पासून सुरु झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दौलत उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक मा गोपाळराव पाटील उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक टी.एम. चौगुले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दौलत उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, संचालक बाबू शिंदे, हजगोळकर उपस्थित होते.
















































