…इथे महिला माध्यमकर्मीच्या अभिव्यक्तीचाच मुडदा पडलाय! कशी मिळणार महिलांना समान संधी,समान अधिकार?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
जिथे पत्रकारिता म्हणजे काय, वृत्तपत्र चालवणे म्हणजे काय ,त्यामध्ये असलेल्या पदांची जबाबदारी काय याचं ज्ञान आणि भान नसलेले वृत्तपत्र चालवू लागले,  बिझनेसच्या हिशोबात बोलू लागले ,तोलू लागले पेड बातम्यांचा आग्रह धरू लागले आणि काम करणाऱ्या महिला पत्रकाराचे विविध प्रकारे खच्चीकरण करू लागले तर  समान संधी समान अधिकार तर सोडाच पण किमान हक्क कसे मिळणार ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे !

अनेक वृत्तपत्र,वृत्तवाहिन्यात अशाच प्रकारचे दमन तेथील बेअक्कल आणि कमी गुणवत्ता असणारे मात्र मालक आणि व्यवस्थापना पुढे गोंडा घोळणारे किंवा हे प्रसारमाध्यम फक्त आपल्यासाठी चालवायचे आहे ही भावना मनात ठेवून केवळ आणि केवळ आपला खिसे गरम  करणारे आपली खुर्ची बळकट करण्यासाठी काहीही करणारे व मालकाला खोटी आश्वासन देऊन  गंडा घालणारे वृत्तपत्रातील अथवा वृत्तवाहिन्यातील कॅप्टन ऑफ द शिप म्हणून संपादकीय विभागातील मोठ्या पदावर काम करू लागले तर पत्रकारितेची माती आणि आणि  नीती मुल्यांचे, माणुसकीचा अध:पतन हे निश्चित आहे !

आम्ही पत्रकारांच्या,  पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या आणि संपादक, प्रकाशक मालक यांच्या सन्मानार्थ हक्कासाठी अधिकारासाठी काम करण्याची भाषा बोलतो; मात्र या कशाचीही जाणीव नसलेली माणसं जेव्हा चाटूकरिता करून आपली गुणवत्ता योग्यता  नसतानाही वरिष्ठ पदावर बसतात तेव्हा प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला पत्रकाराचे खच्चीकरण मानसिक छल होणे ही रोजचीच गोष्ट होते!सध्याच्या काळात पत्रकाराच्या गॅंग चालवणारे, पोसणारे यांचे लोक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत !त्यामुळे महिलांना समान संधी समान अधिकार आणि सन्मान मिळण्याची गोष्ट तर सोडाच काम करताना अनेक प्रकारच्या त्रासांना दमनाला रोजच सामोरे जावे लागतेय!

लोकमानस समजून न घेता फक्त आणि फक्त आपला गल्लाणा करणारे मारवाडी वृत्तीचे लोक पत्रकारांना आपले आपल्या उद्योगातील गुलाम म्हणून वागणूक देतात तेव्हा त्यांचा त्यांचा समाजात स्पर्धा पास करणे पडदा फास्ट करणे आणि अशा लोकांच्या हाती वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनीचे साधन असू नये म्हणून एक चळवळ चालवणे आवश्यक आहे !

आम्ही लोकशाहीचे चौथ्या स्तंभाचे रक्षक म्हणून काम करताना स्वतःच्या भारतीय संविधानाने, घटनेने दिलेल्या अधिकाराचे रक्षण करू शकत नसू तर आपण या क्षेत्रातील लोकरक्षक म्हणून जगण्यास नालायक आहोत असेच म्हणावे लागेल! 

वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनी चालवण्यासाठी सत्ताधारी लोकांना खुश करणे प्नशासक व प्रशासकांना सांभाळणे चुकीचे आहे असे म्हणता येत नाही, मात्र वरिष्ठ पदावर असलेली बुजगावणी आपली दुकाने लावून मनमानी करत असतील आणि त्याकडे व्यवस्थापन मालक दुर्लक्ष करत असेल तर याचा अर्थ तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानाने काम करण्याचा अधिकारच त्या आस्थापनाने काढून घेतला आहे असे ठामपणे म्हणता येईल!

  • प्रसार माध्यमातील अनेक आस्थापनामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी तक्रार निवारण समितीच नसते, ते कशाला सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली निर्देशित केलेल्या महिला लैंगिक अत्याचार विरुद्धची समितीच नसते त्यामुळे आस्थापनातील महिला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारे होत असणाऱ्या खच्चीकरणाविरूध्द,अनेक प्रकारे शोषण अत्याचार होत असतात! मानसिक,  आर्थिक, सामाजिक आणि तिच्या गुणवत्तेचे दमन हररोज होत असते !त्यावेळी तिने कोणाकडे न्याय मागावा अशी अपेक्षाच ठेवता येत नाही! तिने काम सोडून जावे अथवा काही ना काही  कारणे देऊन तिला कामावरून काढून टाकता यावे यासाठी षडयंत्र रचली जातात, याची अनेक उदाहरणे आहेत !

मध्यंतरी  स्वतःला नंबर वन म्हणवणाऱ्या  वृत्तवाहिनीच्या डिजिटल विभागातील महिलांना त्रास देणाऱ्या , आपली जबाबदारी पूर्ण न करता महिला पत्रकारांच्याच तक्रारी व्यवस्थापनाकडे करून त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या पाटलाची गच्छंती झाली, ती एका महिला पत्रकाराने तक्रार केल्यामुळे! ती वृत्तवाहिनी किती सूत्रबद्ध चालते हा अभ्यासाचा विषय, कारण स्ट्रिंगर पत्रकारांच्या हाती बूम देऊन त्यांच्याकडून कमाई करून  घेऊन त्यातील वाट्याची मलई खाणारे इनपुटहेड आणि वरिष्ठ पदावर बसलेले लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणवण्याच्या लायकीचे नसणारे दलाल कार्यरत आहेत! परिणामत: एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलेला मात्र आपल्या नोकरीला मुकावे लागले! 

यावरून सध्या महिलांना  समान संधी , समान हक्काची   वाताहात होऊन त्याचा बाजा वाजतो आहे हे दिसून येते! ना आस्थापनावर कोणाचे नियंत्रण,  ना प्रसार माध्यमांना विचारणा करण्याची कोणाची हिम्मत, कारण आपल्या सत्ताकारणात आणि जातीपातीच्या राजकारणाचे  यांना जास्त पडलेल आहे! लोकशाहीचे सर्व स्तंभ ठिसूल बेसूर   झाले आहेत! कोणी महिला आवाज उठवेल तर तिला काढण्यासाठी अनेक चाचे डाकू ,गटारातले किडे वळवळ करायला लागतील आणि ती महिला आहे म्हणून तिची सोयीने बदनामीही करू लागतील !राजकारणातील विकृती कमी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील गटारगंगा मोठी होऊ लागली आहे असेच म्हणावे लागेल!

खरंतर माहिती जनसंपर्क विभाग , वृत्तपत्रांना आणि वृत्तवाहिन्यांना मंजुरी देणार मंत्रालय यांची ही जबाबदारी असते की आपण परवाना दिल्यानंतर ती प्रसार माध्यमे त्या तत्त्वांचे पालन करतात काय ही पडताळणी करण्याचीा ! प्रसारमाध्यमातील महिलांची कधी गेट टू गेदर घेऊन  ऑफ द रेकार्ड माहिती घेण्याचा प्रयत्न  यांनी केलाय का? नसेल तर तसा प्रयत्न का होत नाही?अधिवेशनात अनेक विषयाचा कीस काढतात, प्रसार  माध्यमातील महिलांचे शोषण यावर कधी बोलतील का? कसे बोलतील आपल्या बातम्या लागण्याची चिंताच यांना असते! आजवरच्या इतिहासात ज्याला दात नसलेला वाघ म्हणतात असे प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया स्वतःहून कधी अशा विषयात काही ठोस करताना दिसत नाही! 

राजकीय गुप्त शक्ती अशा प्रसार माध्यमातून आपल्याला सोयीची बुजगावणी मोठ्या पदावर बसवतात! मग मला सांगा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या या माध्यमांमध्ये राम राहिलाय का ?आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारणी बद्दल जोशात आणि अभिमानात लिहितोय, मात्र, माणुसकीचा धर्म नितीमूल्य गुंडाळून ठेवलेली, लोकशाहीचे रक्षक म्हणण्याच्या लायकीची तरी आहेत का असा प्रश्न ऐरणीवर येतोय!कारण या सगळ्या लोकांची घरे काचेची असली तरी आजूबाजूच्या परिसरात समाजात प्रदूषण निर्माण करण्याचे काम करून जनतेचा खरी माहिती घेण्याचा अधिकारही काढून घेताना दिसताहेत!

इतकं लिहिल्यावरही हेच म्हणावं लागेल की समान हक्क समान अधिकार या फक्त बाता आहेत,बाकी सब चंगा है! लोकशाहीचा विजय असो,आमच्या अभिव्यक्तीच्या मुडद्याचा विजय असो! आमच्या गुलामीचा विजय असो! लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील चाचे डाकू गटारकिड्याचा विजय असो!

तरीही आपण म्हणून,… उष: काल होता होता कालरात्र झाली,  अगं पुन्हा   आयुष्याच्या पेटवू मशाली!

शीतल करदेकर-7021616644 
संस्थापक- अध्यक्ष

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.