गोकुळ संघाच्या ३२ अनुदान योजना…उत्पादकांनी घ्यावा लाभ – नाविद मुश्रीफ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शाहुवाडी- (दशरथ खुटाळे,TEAM POSITIVEWATCH)   शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक संदेश! “शेतकरी सक्षम झाला पाहिजे, दूध उत्पादक बळकट झाला पाहिजे, आणि गोकुळ त्यासाठी कायम पाठीशी उभा आहे…” अशी ठाम ग्वाही गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी दिली.बांबवडे येथे झालेल्या शाहूवाडी तालुका संपर्क सभेत ते बोलत होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले – दूध उत्पादकांसाठी गोकुळने तब्बल ३२ वेगवेगळ्या अनुदान योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन दूध उत्पादन वाढवावे. पुणे-मुंबई येथे गोकुळच्या दुधाची मोठी मागणी आहे. विशेषतः म्हशीच्या दुधास वाढती मागणी असल्याने त्यासाठीचे अनुदान ३० हजारांवरून थेट ५० हजार रुपये करण्यात आले आहे.

शाहूवाडीतील वैशिष्ट्ये आणि मागण्या
▪️ माजी चेअरमन अरुण डोगळे आणि विश्वास पाटील यांनी – गोगवे केंद्राची क्षमता २ लाख लिटरपर्यंत असल्याने उत्पादकांनी दूधवाढीसाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहन केले.
▪️ संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी – “शाहूवाडीत पशुधन मोठ्या प्रमाणात आहे, मात्र पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे, ती तातडीने दूर करावी,” अशी मागणी केली.

सन्मान व धनादेश वाटप
▪️ स्वच्छ-सुंदर गोठा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिवाजी शामराव वडिंगेकर यांचा सन्मान.
▪️ सभासदांच्या मृत जनावरांना अनुदानाचे घनादेश वाटप.

सभेत अमर पाटील, चेतन नरके, अजित नरके, बाबासाहेब चौगले, मुरलीधर जाधव, सर्जेराव पाटील, सुभाष इनामदार, महादेवराव पाटील, विष्णू पाटील, अमर खोत, डॉ. सुजित मिणचेकर, अंजनाताई रेडेकर, पांडुरंग केसरे, दाजी चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते.


Positivewatch307 म्हणतोय :
“शाहूवाडीच्या शेतकऱ्याने गोकुळच्या अनुदान योजनांचा लाभ घेतला तर दूध क्रांतीची नवी लाट उसळणार हे नक्की! शेतकऱ्यांच्या प्रगतीनेच तालुका प्रगती करतो.”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.