“मला देव भेटला ‘आमचा भाई, अशोक सराफ’…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अनेक कलाकार भेटले ,खूप अनुभवलं, त्यावर रंगकर्मी हरीष करदेकर “चौथा अंक” पुस्तक…

मुंबई – सेटिंग, प्रॉपर्टी, कपडे पट, पार्श्वसंगीत रेकॉर्ड ऑपरेटिंग आणि सोबत छोट्या छोट्या भूमिका अशी कामे १९६९ ते ९० पर्यंत केली. सुरुंग, वादळ, डॉक्टर लागू, झपाटलेली, डार्लिंग डार्लिंग, बोल राधा बोल, हमिदाबाईची  कोठी, मवाली अश्वमेघ, अजून यौवनात  मी आकाश पेलताना, दुभंग आदि नाटकांचे जवळपास साडेपाचहजाराहून अधिक प्रयोग केले असे नाट्यकलावंत हरीष रामचंद्र करदेकर  यांचा सन्मान  नटश्रेष्ठ अशोक सराफ व डॉ. संजय पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

हरीष करदेकर यांचे मनोगत  सूत्रसंचालक अभिनेते अतुल परचुरे यांनी वाचून दाखवले,” माझा देव मला भेटला १९७४ ला, त्याने आमचं लग्न लावून दिलं असा अशोक सराफ आमचा भाई !त्यांनी व मी  कामाची सुरवात १९६९ पासून केली,मला माझ्या कामानिमित्त अनेक माणसं भेटली  खूप अनुभवलं, त्यावर “चौथा अंक” हे पुस्तक लिहितोय, ही माझी मानवंदना..!” कृतज्ञ मी… कृतार्थ मी… या  कार्यक्रमात नटश्रेष्ठ अशोक  सराफ यांच्या वतीने नाट्य  क्षेत्रातील विष्णू जाधव, सुरेंद्र दातार,  बाबा पार्सेकर, सीताराम कुंभार, प्रकाश बुद्धिसागर, वसंत इंगळे, दिप्ती भोगले, उपेद्रा दाते , नंदलाल रेळे आदी २० रंगमंच कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंचामागील कलाकारांच्या सन्मानाचे आयोजन दादरच्या स्वा सावरकर सभागृहात करण्यात आले होते.

मागील वर्षी ४ जून रोजी नटश्रेष्ठ अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतासन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली होती त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन अशोक सराफ, निवेदिता सराफ व सुभाष सराफ यांचे वतीने ग्रंथालीच्या  सहकार्याने करण्यात आले होते.

यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अल्कोन इंटरप्राईजेस चे अनिल खवटे,दुबई चे प्रख्यात डॉक्टर संजय पैठणकर  आणि अशोक सराफ यांचे हस्ते रंगकर्मीचा सन्मान करण्यात आला. निवेदिता सराफ, सुभाष सराफ, ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर  यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे यांनी सादर केली. संगिताची साथ साई बँकर, निरंजन लेले यांनी केली. संहिता अरुण जोशी यांची होती.  तर अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक कार्यक्रमाचे रेखीव सूत्रसंचालन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.