‘बँक बचाव पॅनल’ च्या तीनही उमेदवारांची कोरी पाटी , नियमबाह्य व विनातारणी कोट्यावधी रुपयांचे कर्ज वसुली करुन ठेवीदारांना ठेवी परत मिळणे आवश्यक!
शिरपुर (विशेष प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील एकेकाळी नामांकित असलेली दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या गैरप्रकारांसंबंधी अनेक प्रकरणे उजेडात आणणा-या ‘बँक बचाव समिती’चे तीन प्रमुख उमेदवार ही संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रिंगणात उभे आहेत. प्रचाराचा शुभारंभ शिरपूर निमझरी नाका जवळील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात,खर्दे बु।। येथील श्रीदत्तप्रभु मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर तसेच श्री मारुती मंदिर शिरपुर येथे नारळ वाढवून या पॅनलचे मुख्य मार्गदर्शक सर्वश्री मोहन साहेबराव पाटील, ओंकार आबा जाधव, केवलअप्पा राजपूत, रमेशआबा करंकाळ, भरतसिंह राजपूत, हेमंतभाऊ गुलाबराव पाटील, गोपाल के. मारवाडी, डॉ सरोजताई पाटील, हिरालाल कोळी,भरतभाऊ रोकडे, गणेशभाऊ देवरे इ.सह सर्वसामान्य गटातील उमेदवार श्री शिवाजीराव हनुमंतराव बोरसे पाटील, योगेंद्र देवीसिंह पाटील राजपूत, आणि इतर मागासवर्गीय गटातून उभे असलेले उमेदवार कलाल प्रकाश वसंतराव (प्रमोदभाऊ) हे उपस्थित होते.
प्रचार फेरी दरम्यान शिरपुर शहरातील व्यापारी वर्ग आणि उद्योजक तसेच ग्रामीण भागातील व्यापारी मतदारांचा त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.तसेच दिवसेंदिवस विविध संघटनांनी त्यांना दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेची हलाखीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाठिंबा देऊन विश्वास दर्शविला आहे असे सांगितले जाते.येथे उल्लेखनीय आहे कि,’बँक बचाव समिती’ स्थापन झाल्यानंतर या बँकेच्या आतील भोंगळ आणि अनागोंदी कारभाराचे बिंग फुटले. सभासद जागृत झाले.त्यामुळे बँक बचाव पॅनलचे विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली. तसेच मतदारांनी सूज्ञपणे मतदान केले तर परिणाम काय होईल हे सांगता येत नाही? अशी चर्चा जोरात आहे.’बँक बचाव समिती’ च्या सूज्ञ तक्रारदार सभासदांच्या अर्जावर राज्य सहकार आयुक्त सो।, पुणे यांनी दखल घेऊन सखोल चौकशी करून कार्रवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तशीही अपात्रतेची टांगती तलवार अद्याप जुन्या 14 संचालकांच्या डोक्यावर कायम आहेच.विशेष टेस्ट ऑडिट सुद्धा सुरू आहे. काही संचालकांचे बाबतीतही तालुकाभर चर्चा सुरूच आहेत.
म्हणून एकंदरीत संभ्रमात टाकणारी परिस्थिती आहे. मात्र ‘बँक बचाव पॅनल’ चे सर्व तीनही उमेदवारांची कोरी पाटी आहे, म्हणून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच या तीन्ही उमेदवारांचे भवितव्य निश्चित करेल असे चित्र दिसते आहे.यातील सर्वसाधारण गटातील उमेदवार योगेंद्र देवीसिंह पाटील राजपूत यांची निशाणी बस आहे. शिवाजीराव हनुमंतराव बोरसे पाटील यांची निशाणी शिट्टी आणि इतर मागासवर्गीय गटातून उभे असलेले उमेदवार कलाल प्रकाश वसंतराव (प्रमोदभाऊ कलाल) यांची निशाणी सुध्दा शिट्टी आहे. या तीनही उमेदवारांना ‘दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बचाव समिती’ ने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी शिरपुर शहर आणि ग्रामीण मतदारांना विनम्र आवाहन केले आहे ! एकूणच मतदार बंधू-भगिनींना जागृत राहून कोणत्याही आमिषाला बळी न पडता सूज्ञ व डोळसपणे मतदान करुन “भ्रष्टाचार हटाव, सहकार बचाव” हे सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली आहे.
तरी ‘बँक बचाव पॅनल’ चे सर्व तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याची आणि सेवेची संधी द्यावी असे आवाहन बँक बचाव समिती तर्फे मोहन साहेबराव पाटील,ओंकार आबा जाधव, हेमंतभाऊ पाटील, केवलअप्पा राजपूत, रमेश आबा करंकाळ, भरतसिंह राजपूत, गोपाल कन्हैयालाल मारवाडी, हिरालाल कोळी, डॉ सरोजताई पाटील, भरतभाऊ रोकडे, गणेशभाऊ देवरे यांसह विविध मान्यवरांनी केले आहे. तर विरोधी सहकार पॅनलचे चिन्ह कपबशी आहे. त्यांचे गटातील समर्थकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. दोन्ही गटातील कोणकोणत्या उमेदवारांना सभासदांची मते मिळतील ते येत्या काळात स्पष्ट होईलच. एक स्वतंत्र उमेदवार ही रिंगणात उभे आहेत. परंतु ठेवीदारांची प्रचंड गर्दी,महिन्यांपेक्षाही अधिक ठप्प असलेले या बँकेचे इतर बँकिंग व्यवहार जसे चेक क्लिअरिंग व दोन्ही एटीएम मशीन बंद हे सर्व लोकांनी विशेषकरून सर्व सभासदांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.त्याचाही परिणाम निवडणुकीत काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल?