महाराष्ट्रभर लवकरच दौरे… संघटनेला मोठी गती…
हिंगोली – गवळी समाज संघटनेची मुंबई येथे दि.१७ ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली असुन या बैठकीत संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी हिरामण अप्पा गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी बैठकीत मा. केंद्रीय गृह मंत्री व गवळी समाजाचे मार्गदर्शक हसंराज आहिर, शंकर माटे (मुंबई), अशोक मंडले(सचिव), प्रविण हुंडीवाले(युवा प्रदेशध्याक्ष), वसंत नामा गवळी(मनमाड), अशोक दाते(मुंबई), अजय बिरवटकर, दिपक खताडे, सदाशिव खडके, शिवाजी लंगाटे, दिपक लंगोटे आदीसह राज्याभरातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. हिरामण अप्पा गवळी यांच्याकडे सन २०२० पासुन महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची धुरा खांदयावर असतांना त्यांनी चार वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्षच काम करता आले.
दोन वर्ष हे कोरोना महामारीच्या काळात निघुन गेले. परंतु दोन वर्षात जे काम केले त्यात त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करुन समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील गवळी समाजाच्या जनतेनी पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करुन संधी दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभर लवकरच ते दौरे करणार असुन संघटनेला मोठी गती देण्याचे काम करणार आहेत. या निवडीबद्दल समाजातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.