क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य मंत्र्यांचे पंचायतींना पत्रातून आवाहन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला मिळणार गती

कोल्हापूर – प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत (PMTBMBA) गावपातळीवर मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समुदाय सहभागातून क्षयरोग निर्मूलन चळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहन पत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. याबाबत प्रत्येक पंचायतीला त्यांच्या स्वाक्षरीने पत्र दिली जात आहेत.

पत्रामध्ये टीबी मुक्त पंचायत घोषित करण्यासाठी गावोगावी टीबी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वांगीण सहाय्य उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक ग्रामपंचायतीने निक्षय मित्र म्हणून सक्रीयपणे सहभागी होऊन टीबी रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. गाव पातळीवरील आरोग्य कर्मचारी, उपकेंद्र/आयुष्मान आरोग्य मंदिरातील आरोग्य पथके व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने क्षयरोग दुरिकरणासाठी उल्लेखनीय कार्य सुरु आहे. निरोगी स्पर्धेच्या माध्यमातून क्षयरोगाशी निगडित समस्या सोडविणे व ग्रामपंचायतींच्या योगदानाचे कौतुक करणे हे ‘टीबी मुक्त पंचायत’ उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे. महाराष्ट्राने सन 2024 मध्ये 7 हजार 401 ग्राम पंचायती टीबी मुक्त म्हणून घोषित केल्या आहेत.

राज्यात टीबी मुक्त पंचायत उपक्रमाचा एकसमान व प्रभावी अंमल होण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये ग्रामपंचायत विकास आराखड्यात (GPDP) टीबी दुरिकरण घटकांचा तसेच टीबी विजेते तसेच निक्षय मित्रांच्या अधिक प्रभावी सहभागाचा समावेश करुन क्षयरोग दुरिकरणामध्ये आपला सहभाग नोंदवावा. यासाठीचे प्रशिक्षण साहित्य केंद्र शासनाच्या Swasthya-e-Gurukul/SAKSHAM पोर्टलवर उपलब्ध आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.