प्रतिसाद: राजूमामा सोशल फाउंडेशनचे आरोग्य शिबीर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कै. राजेंद्र नागू यादव (मामा) डेप्युटी संरपंच यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर – राजूमामा सोशल फाउंडेशनच्या वतीने नागाव ता. हातकलंगले येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला ग्रामस्थ तसेच लाभार्थीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मोफत रक्त तपासणी, मोफत जनरल चेकअप शिबीर, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, डोळे तपासणी शिबीर यासारखे उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.. जवळपास ५०० हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. प्राथमिक उपचार ही करून घेतले. असेच समाजउपयोगी उपक्रम राबवून, फौंडेशन व गावाचे नाव उज्वल करावे अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली.

या कार्यक्रमाचे आयोजन राजूमामा सोशल फाउंडेशनचे सदस्य अजिंक्य यादव, रुपेश आठवले, संतोष घाटगे, सतीश लंबे,सागर शिंदे,संदीप यादव, ऋतिक मिणेकर, सहिल मिणेकर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नागाव गावाचे सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी व मित्र परिवार उपस्थित होता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.