प्रेमचंद यांचे साहित्य लोकशाही मूल्यांचा व समतेचा झरा-डॉ. प्रकाश मुंज

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
डॉ. प्रकाश मुंज- जयंतीनिमित्त एएससी महाविद्यालयात व्याख्यान
इचलकरंजी – “प्रेमचंद यांचे साहित्य म्हणजे समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांचा आवाज आहे. आजही त्यांच्या लेखनातून लोकशाही मूल्ये, सामाजिक समता आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे प्रभावी मार्गदर्शन मिळते,” असे मत शिवाजी विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक डॉ. प्रकाश मुंज यांनी व्यक्त केले.येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आणि आक्काताई रामगौंडा पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेमचंद जयंती निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. मुंज प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. “वर्तमान काळात प्रेमचंद यांच्या साहित्याची प्रसंगिकता” या विषयावर त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले. डॉ. मुंज यांनी प्रेमचंदांच्या कथा व कादंबऱ्यांमधील वास्तवदर्शी पात्रांचे मनोज्ञ विश्लेषण करताना सांगितले की, ईदगाह, पंच परमेश्वर, सद्गति’, ‘पूस की रात’, ‘कफ़न’,‘गोदान’ अशा कथांमधून सामाजिक अन्यायाविरुद्धचा संघर्ष, जातीपात आणि वर्गभेदावरचा प्रहार, तसेच करुणा आणि सहवेदनेचा प्रत्यय येतो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. ए. यादव होते. प्रा. निलेश जाधव यांनी प्रस्तावना केली. प्रा. किशोरी टोनपे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. अपर्णा कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विठ्ठल नाईक, डॉ. अंजली उबाळे, इतर प्राध्यापकगण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. फोटो ओळ
इचलकरंजी येथे आयोजित प्रेमचंद जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानात डॉ. प्रकाश मुंज यांचा सत्कार उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. निलेश जाधव व डॉ. विठ्ठल नाईक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.