केडीसीसी बँकेच्या संचालकांची स्ट्रॅटफोर्ड कवी, लेखक व नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या घराला भेट
“फादर ऑफ ड्रामा” च्या घराला भेट दिल्याचे समाधान मोठे
कोल्हापूर,:मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळासह लंडन आणि स्कॉटलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी इंग्रजीतील सुप्रसिद्ध कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या स्ट्रॅटफोर्ड शहरातील घराला भेट दिली. लंडन शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या स्ट्रॅटफोर्ड शहरातील हे घर ब्रिटिश सरकारने संरक्षित स्मारक म्हणून जतन केलेले आहे.

याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, इंग्रजीतील सुप्रसिद्ध कवी व नाटककार विल्यम शेक्सपियर यांची नाटके आणि काव्ये अजरामर आहेत. त्यांनी लिहिलेल्या शोकांतिका विशेषत: गाजलेल्या आहेत. त्यांच्या साहित्याचा प्रभाव मराठी साहित्यिकांवरही आहे. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेलो, किंग लियर, रोमियो अँड ज्युलियट व इतर अशी अनेक नाटके जगप्रसिद्ध झाली आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, कवी व नाटककार म्हणून ओळख असलेल्या शेक्सपियर यांना “फादर ऑफ ड्रामा” असा लौकिक मिळालेला आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झालेल्या त्यांच्या नाटकांचे जगभर असंख्य प्रयोग झालेले आहेत आणि आजही होत आहेत.
.