चंद्रकांत पाटील
मांडुकली येथील केंद्रशाळेत आजी आजोबा दिवसानिमित्त उपस्थित आजी आजोबा व शिक्षक…
गगनबावडा – मुलांच्या जडणघडणीत आजी-आजोबांचे प्रेम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असून त्यांची माया मुलांना संस्कारीत होण्यास फायदेशीर ठरते असे मत आर. एस. पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रशाळा मांडुकली (ता.गगनबावडा) शाळेत आजी-आजोबा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
![]() |
![]() |
अध्यक्ष पंडित सावंत म्हणाले, मुलांच्या पहिल्या सहा वर्षांतील जडणघडण ही सर्वाधिक आजी आजोबा यांच्या सानिध्यात होते. लहानपणी आजी-आजोबाच मुलांच्यावर संस्कार करत असल्याने ख-या अर्थाने आजी-आजोबा म्हणजे संस्काराच्या शाळा आहेत. आजी-आजोबांशी असलेले नाते अधिक दृढ होण्याच्यादृष्टीने शासनाने सुरु केलेला आजी-आजोबा दिवस हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
याप्रसंगी रंगराव पडवळ, केरबा आंबेकर, विमल पडवळ तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन, औक्षण करण्याबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा माधुरी पडवळ, सदस्य केरबा आंबेकर, मुख्याध्यापिका राधिका पाटील, अध्यापक रामेश्वर विभुते, अध्यापिका समिधा पोवार यांच्यासह विद्यार्थ्यांचे आजी आजोबा व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका राधिका पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन रामेश्वर विभुते यांनी केले तर आभार अद्यापिका समिधा पोवार यांनी मानले.
