आकुर्डे येथे शरद सहकारी सूतगिरणी उभारणी कामाचा भव्य शुभारंभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सहकारातून समृद्धी साधूया, मतदारसंघ रोजगारक्षम बनवूया..! पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पायाभरणी कामाचा शुभारंभ…

गारगोटी – भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे शरद सहकारी सूतगिरणी या महत्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पाच्या उभारणी कामाचा भव्य शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सूत गिरणीचे चेअरमन बी. एस. आण्णा देसाई होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सूतगिरणीच्या स्थापनेमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावेल, ग्रामीण भागातील सहकारातून उद्योग उभारणीचा हा आदर्श प्रकल्प ठरेल, युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराची नवी दारे खुली होतील. आज आपण शरद सहकारी सूतगिरणी उभारणीचा शुभारंभ करत आहोत, ही केवळ सूतगिरणी नाही तर शेतकरी आणि युवकांसाठी नव्या भविष्याची सुरुवात आहे. माझा विश्वास आहे की, सहकार आणि उद्योग यांचा संगम झाला तर ग्रामीण भागाचा विकास होईल. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मतदार संघात विविध प्रकल्प निर्माण करून ‘रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर’ बनवूयात आणि ही सूतगिरणी त्या प्रवासाची पहिली पायरी आहे. पुढील काळात भुदरगड तालुक्यातील देवर्डे येथील साखर कारखाना व राधानगरी तालुक्यातील अत्याधुनिक सूतगिरणी उभारण्याचा आमचा संकल्प आहे. शरद सूतगिरणी या प्रकल्पाची येत्या वर्षभरात उभारणी होईल असा विश्वास पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला. याचबरोबर मतदार संघातील पर्यटनाला चालना देऊन विविध रोजगाराच्या संधी पुढील काळात उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी वक्त केला.

कार्यक्रमाचे स्वागत व्हा चेअरमन अशोक फराकटे यांनी तर प्रस्ताविक दत्ताजीराव उगले यांनी केले. यावेळी शरद सुतगिरणीचे चेअरमन बी. एस. आण्णा देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नेते के. जी. नांदेकर, आनंदराव आबिटकर, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, दत्ताजीराव उगले, अरुण जाधव, जालंदर पाटील, अशोक पाटील, अंकुश चव्हाण, सूर्याजी देसाई, अशोकराव भांदिगरे, निवासराव देसाई, शिवाजी ढेंगे, संदिप व्हरंडेकर, आर. जी. पाटील, विजय बलुगडे, संग्रामसिंह सावंत, दीपक शेट्टी, प्रशांत भावके, तानाजी चौगले, वनिता पाटील, आक्काताई नलवडे तसेच शरद सूत गिरणीचे संचालक अर्जुन आबिटकर, यशवंत नांदेकर, धैयशील भोसले, शहाजी देसाई, अनंत पाटील, रंगराव मगदूम, अतुल पाटील, रामचंद्र शिऊडकर, दादासो पाटील, उमाजी पाटील, सुनिल जठार, बाळकृष्ण भोपळे, महादेव खोत, उमेश तेली, सौ. वैशाली डवर, सौ. विजया देसाई यांच्यासह राधानगरी, भुदरगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकाराच्या या नव्या पर्वाचे साक्षीदार झाले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.