कोल्हापूरात तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत भव्य बाईक रॅली; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रत्येक तरुणाने स्वतःसह आपल्या मित्रपरिवाराला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा

कोल्हापूर – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ KIT सनशाईन यांच्या संयुक्त विद्यमाने “तंबाखू मुक्त युवा अभियान ३.०” अंतर्गत रविवारी कोल्हापूर शहरात जनजागृतीपर युवा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आजचे तरुण फॅशन, मित्रांच्या संगतीत, नोकरीतील प्रमोशन, पार्ट्या किंवा सोशल मीडियावरील इतरांचे अनुकरण करताना तंबाखू आणि ड्रग्ससारख्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरुण पिढी ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. राष्ट्र उभारणीची ताकद फक्त तरुणांमध्येच आहे. म्हणून प्रत्येक तरुणाने स्वतःसह आपल्या मित्रपरिवाराला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त करीत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात, जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर, दंतवैद्य डॉ. अर्चना पाटील तसेच रोट्रॅक्ट क्लब सनराइजचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी अभियानाचा आढावा सादर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दसरा चौक ते ताराराणी चौक असा मुख्य मार्ग घेऊन भव्य बाईक रॅली काढण्यात आली. तसेच मुख्य बस स्थानकावर पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाला तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमास KIT कॉलेजचे डॉ. संदीप देसाई, NSS समन्वयक डॉ. श्रीनिवास पाटील, प्रदीप मोरे, यशोदत्त पाटणकर, समुपदेशक श्रीमती कणसे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शिंदे यांच्यासह रोट्रॅक्ट क्लब सनशाईनचे सदस्य, तरुण-तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.