अध्यक्षपदी अमरदीप पाटील, उपाध्यक्षपदी संजय थोरवत..कोठे निवड झाली वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*’ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड

*अध्यक्षपदी अमरदीप पाटील, उपाध्यक्षपदी संजय थोरवत, सचिवपदी शिरीष खांडेकर, खजानीसपदी राजाराम शिंदे*

कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सिज व जाहिरात व्यवसायास पूरक सेवा देणाऱ्या विविध घटकांच्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन (आसमा) या संघटनेचे अध्यक्षपदी अमरदीप पाटील (ॲडफाईन) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय थोरवत (गणेश प्रिंटर्स), सचिवपदी शिरीष खांडेकर (निर्मिती ॲडव्हर्टायझिंग) व खजानीसपदी राजाराम शिंदे (अलंकार पब्लिसिटी) यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या सन २०२५-२७ या द्वैवार्षिक निवडणुकीत वरीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

संचालकपदी अभय मिराशी, संजय रणदिवे, विवेक मंद्रुपकर, अविनाश पेंढुरकर, अमरसिंह भोसले, अतुल उपळेकर, शैलेश गर्दे, प्रशांत बुचडे, अनिरुद्ध गुमास्ते, किरण वडगावकर व प्रशांत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला दै. केसरीचे संपादक श्री दिपक टिळक यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेला कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मावळते अध्यक्ष सुनील बासरानी यांनी सर्वांचे स्वागत करून गतवर्षातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सचिव संजीव चिपळूणकर यांनी कार्यअहवाल मांडला. खजानीस राजाराम शिंदे यांनी ताळेबंद अहवाल व नफा-तोटा पत्रक सादर केले.

विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. जाहिरात व्यवसायातील अडचणींबाबत व बदलत्या प्रवाहाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

निवडीनंतर अमरदीप पाटील

काय म्हणाले

जाहिरात व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करू असे मनोगत नूतन अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.बदलत्या काळानुसार जाहिरात एजन्सीनी प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून परिपूर्ण सेवा देण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले. ‘फेम’ या राज्यस्तरीय संघटनेच्या संचालकपदी सुनील बासरानी तसेच खजानिसपदी कौस्तुभ नाबर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार फेमचे माजी अध्यक्ष महेश कराडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी अनंत खासबारदार, चारुदत्त जोशी, महादेव शिंदे, संजय होगाडे, शरद पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. मनीष राजगोळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव शिरीष खांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

ENGLISH READER

http://*Advertising Agencies Association (AASMA) New Office Bearers elected unopposed* Amardeep Patil elected as President; Sanjay Thorwat as Vice President; Shirish Khandekar as Secretary; Rajaram Shinde as Treasurer Kolhapur – Amardeep Patil (Adfine) has been elected as the President of the Advertising Agencies and Media Association (AASMA), an organization representing advertising agencies and allied services in South Maharashtra. Sanjay Thorwat has been elected as Vice President, Shirish Khandekar as Secretary, and Rajaram Shinde as Treasurer. These appointments were made during the recently held biennial elections for the 2025–2027 term. The following individuals were elected as directors: Abhay Mirashi, Sanjay Randive, Vivek Mandrupkar, Avinash Pendharkar, Amarsingh Bhosale, Atul Uplekar, Shailesh Garde, Prashant Buchade, Aniruddha Gumaste, Kiran Vadgaonkar, and Prashant Kulkarni. The meeting began with a tribute to Mr. Deepak Tilak, Editor of Daily Kesari, on his recent demise. The gathering saw a large turnout of members from Kolhapur, Sangli, and Ichalkaranji. Outgoing President Sunil Basrani welcomed everyone and reviewed the organization’s activities from the past year. Secretary Sanjeev Chiplunkar presented the annual report, while Treasurer Rajaram Shinde submitted the balance sheet and profit and loss statement. All agenda items were unanimously approved. A detailed discussion took place regarding the challenges in the advertising industry and the evolving trends. Newly elected President Amardeep Patil expressed his commitment to resolving issues faced by advertising professionals and to working towards the growth of the industry. He urged advertising agencies to equip themselves with advanced technologies in order to provide comprehensive services in line with changing times. Sunil Basrani was felicitated for being elected as a Director of FAME (a state-level federation), and Kaustubh Nabar was honored for his election as Treasurer. The felicitation was done at the hands of former FAME President Mahesh Karadkar. Anant Khasbardar, Charudatta Joshi, Mahadev Shinde, Sanjay Hogade, and Sharad Patil actively participated in the discussions. Manish Rajgolkar served as the election officer. Secretary Shirish Khandekar delivered the vote of thanks.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.