गोकुळ निवडणूक लांबण्याची शक्यता; १२०० संस्थांच्या प्रश्नावर सुनावणी आठवडाभर पुढे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

‘गोकुळ’च्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर (शेखर धोंगडे) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र सुमारे १२०० दूध संस्थांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे १२०० प्राथमिक दूध संस्थांच्या अवसायन (लिक्विडेशन) आदेशाला स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संस्था मतदानासाठी पात्र राहणार की नाही, यावर गोकुळच्या निवडणुकीतील समीकरणे अवलंबून आहेत. गेल्या शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी वकिलांना या १२०० संस्थांबाबत मंत्र्यांकडून झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदत मागितली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.

दरम्यान, या प्रकरणातील विलंबामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्राथमिक दूध संस्थांकडून ठराव मागवण्याची प्रक्रिया सध्या थांबली असून न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच अंतिम मतदार यादी जाहीर होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीचे वेळापत्रकही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.