गोकुळ दूध संघ हा कष्टकरी, श्रमजीवी शेतकऱ्यांचा आहे. – सतेज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

गोकुळच्या दूध उत्पादकांना जादा मोबदला देण्यास कटिबद्ध…

कोल्हापूर – ‘गोकुळ दूध संघ ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून दूध संघ हा कष्टकरी, श्रमजीवी शेतकऱ्यांचा आहे. त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. दूध उत्पादकांना जादा मोबदला देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’ अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा सोमवारी (२१ ऑगस्ट) झाली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी येथे सभा झाली.

आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ या संस्थेचा पाया स्वर्गींय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी घातला. त्यांनी पाहिलेल्या स्वप्ने पुर्ण करण्‍याची जबादारी सर्वांवर आहे. गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे, बचतीचे धोरण अवलंबले आहे. संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्याना जादा मोबदला देण्यास प्रयत्नशील आहोत. के.डी.सी.सी बँक मार्फत आण्णासाहेब पाटील महामंडळ कडून म्हैस खरेदीसाठी पूर्वी १ लाख रुपये होती ती रक्कम वाढवून देण्यात येणार असल्याचे सांगितले संघाचे २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्ण करण्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले, ‘करवीर तालुक्यातील दूध उत्पादक, दूध संस्था यांच्या अडी–अडचणी तसचे दूध उत्पादकांना संघाच्या विविध योजनांचा माहिती होण्यासाठी संघाकडून संपर्क सभेचे आयोजन केले आहे. सर्व दूध संस्था प्रतिनिधीचे मी संघाच्या वतीने स्वागत करतो गोकुळची ओळख म्हैस दुधाची आहे. करवीर तालुक्यातून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी संघाच्या विविध योजना तसेच स्व. आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम योजना प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

याप्रसंगी दूध उत्पादकांच्या विविध शंकांचे निरसन संचालक पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, शरद तुरंबेकर, भरत मोळे आदींनी केले. संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक बाबासाहेब चौगले यांनी आभार मानले. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरवण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी संचालक अजित नरके, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, रणजितसिंह पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.